
राज्यात अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका
राज्यात आज ५ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या
तुकाराम मुंढे यांची २३ व्यांदा बदली
मुंबई : राजकीय नेत्यांना स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीचे वेध लागले आहेत. या निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने जोरदार तयारी सुरु केली आहे. एका बाजुला निवडणुकीचे पडघम वाजत असताना दुसरीकडे प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा धडाका सुरु आहे. आज मंगळवारी ५ भारतीय प्रशासकीय सेवा अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी केले आहेत. यात तुकाराम मुंढे यांच्या नावाचाही समावेश आहे.
कोणाची कुठे बदली?
मुंबई येथील विकास आयुक्त (असंघटित कामगार) पदावर असलेले तुकाराम मुंढे यांची बदली ही दिव्यांग कल्याण विभाग, मंत्रालय, मुंबई येथे सचिव म्हणून करण्यात आलीये. त्यांची २० वर्षात २३ व्यांदा बदली करण्यात आल्याचं बोललं जात आहे.
महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक नितीन पाटील यांची बदली आता राज्य कर विभागाच्या विशेष आयुक्तपदी नियुक्त करण्यात आली आहे.
राज्य करांचे विशेष आयुक्त अभय महाजन यांची बदली आता महाराष्ट्र राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन महासंघाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे.
नाशिकमधील इगतपुरी उपविभागाचे सहाय्यक जिल्हाधिकारी ओंकार पवार यांची नियुक्ती आता जिल्हा परिषद, नाशिक येथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) म्हणून करण्यात आली आहे.
नागपूर येथील मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव आशाा अफजल खान पठाण यांची बदली आता महात्मा फुले कृषी विद्यापीठ (VANAMATI), नागपूर येथे महासंचालक म्हणून करण्यात आली आहे. त्यांच्याकडे मुख्यमंत्री सचिवालयाच्या सहसचिव पदाचा अतिरिक्त कार्यभारही राहणार आहे.
प्रशासनाने ५ दिवसांपूर्वी देखील ५ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या होत्या. यामध्ये अजीज शेख, अशीमा मित्तल, श्रीकृष्णनाथ पांचाळ, विकास खारगे आणि अनिल डिग्गीकर यांच्या नावाचा समावेश होता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.