Phone Storage: स्मार्टफोनमधील स्टोरेज कमी करण्यासाठी या टीप्स फॉलो करा

How To Make Storage In Smartphone: सध्याच्या काळात स्मार्टफोन खूप महत्त्वाचा आहे. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग एका क्लिकवर जोडले जाते. स्मार्टफोन विकत घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टोरेज. ज्या स्मार्टफोनमध्ये जास्त स्टोरेज असते त्या स्मार्टफोनमध्ये जास्त फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स डाउनलोड करता येतात.
How To Make Storage In Smartphone
How To Make Storage In SmartphoneSaam Tv

सध्याच्या काळात स्मार्टफोन खूप महत्त्वाचा आहे. स्मार्टफोनमुळे संपूर्ण जग एका क्लिकवर जोडले जाते. स्मार्टफोनच्या माध्यमातून आपण कोणतीही माहिती समोरच्या व्यक्तीला पाठवू शकतो. स्मार्टफोन विकत घेताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्टोरेज. ज्या स्मार्टफोनमध्ये जास्त स्टोरेज असते त्या स्मार्टफोनमध्ये जास्त फोटो, व्हिडिओ आणि फाईल्स डाउनलोड करता येतात. परंतु अनेकदा फोनमध्ये आवश्यक स्टोरेज उपलब्ध नसते. त्यामुळे स्मार्टफोन स्लो काम करतो. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमधील स्टोरेज या मार्गांनी कमी करु शकतात.

अनावश्यक डेटा आणि अॅप डिलिट करा

सर्वप्रथम प्ले स्टोरमधून अॅप्स आणि गेम्सवर जा. त्यानंतर USED टॅबवर क्लिक करा. त्यानंतर तुमच्या कमी वापरातील अॅप्स बघा. त्यानंतर ते अॅप्स डिलिट करा. यानंतर तुमचा अॅप्स डिलिट होईल आणि त्यामधील तुमचा डेटादेखील डिलिट होईल.

फोटो व्हिडिओजचा बॅकअप घ्या आणि डिलिट करा

तुम्ही Google Photos किंवा Dropbox चा वापर करुन फोटो आणि व्हिडिओचा बॅकअप घ्या. यानंतर तुम्ही तुमचे फोटो आणि व्हिडिओ डिलिट करु शकता. यामुळे तुमचे फोटो Google Photos मध्ये सेव्ह राहतील.

म्युझिक अल्बम डिलीट करा

तुमच्या फोनमधील डाउनलोड केलेले म्युझिक अल्बम डिलिट करा. त्याऐवजी ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर तुम्ही गाणी ऐका. यामुळे तुमच्या मोबाईलमधील जास्त स्पेस वाया जाणार नाही.

How To Make Storage In Smartphone
50MP कॅमेरा अन् जबरदस्त फीचरसह Moto G Stylus 5G लाँच; जाणून घ्या किंमत

Whatsapp मीडियातील मेसेज डिलिट करा

सर्वप्रथम Whatsapp वर जा त्यानंतर सेटिंग आणि स्टोरेजवर क्लिक करा. यानंतर ज्या फाइलचे स्टोरेज जास्त आहेत त्या डिलिट करा. यानंतर चॅट मीडिया आणि ग्रुपमधील चॅट डिलिट करा.

फोन रिसेट करा

जर तुमचा फोनमध्ये बिल्कुल स्टोरेज नसेल तर फोन रिसेट करणे हा अंतिम पर्याय उरतो. यासाठी तुम्ही फोन रिसेटवर क्लिक करा. असे केल्याने तुमच्या फोनमधील सर्व डेटा डिलिट होईल. परंतु तुमच्या फोनमध्ये जर डेटा बॅकअप असेल तरच फोन रिसेट करा.

How To Make Storage In Smartphone
Ola च्या सर्वात स्वस्त स्कूटरची डिलिव्हरी सुरू, किंमत फक्त 69999; मिळणार 190Km ची रेंज

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com