WhatsApp Ayushman Card : WhatsApp वरूनच बनवा आयुष्मान कार्ड; घरबसल्या फक्त 5 मिनिटांत पूर्ण होईल प्रक्रिया

Create Ayushman Card : केंद्र सरकारच्या Ayushman Sarathi WhatsApp चॅटबॉटमुळे आता घरबसल्या आयुष्मान कार्ड तयार करणे, डाउनलोड करणे, पात्रता तसापणे आणि eKYC पूर्ण करणे सहज शक्य झाले आहे.
WhatsApp Ayushman Card
WhatsApp Ayushman Cardgoogle
Published On

आयुष्यान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत आयुष्मान कार्ड बनवण्याची प्रक्रिया आता जास्त सोपी झाली आहे. केंद्र सरकारने 'आयुष्मान सारथी' (Ayushman Sarathi) नावाचा अधिकृत WhatsApp चॅटबॉट सुरू केला आहे. त्याच्या मदतीने नागरिकांना घरबसल्या अनेक सेवा मिळणार आहेत. त्यामुळे छोट्या-छोट्या कामांसाठी सरकारी कार्यालय किंवा कॉमन सर्व्हिस सेंटरवर जाण्याची गरज कमी होईल.

नॅशनल हेल्थ अथॉरिटी (NHA) ने हा चॅटबॉट विकसित केला आहे. नागरिकांना दिवसाचे २४ तास आयुष्मान भारत योजनेशी संबंधित डिजिटल सेवा सहज उपलब्ध करून देणे हा यामागचा उद्देश आहे. या सुविधेमुळे नवीन आयुष्यान कार्ड बनवणं, कार्ड डाउनलोड करणं, योजनेसाठी पात्रता तपासणे, eKYC पूर्ण करणे तसेच इतर सेवा WhatsApp वरूनच वापरता येणार आहेत.

WhatsApp Ayushman Card
Bank Holidays : जुलै महिन्यात किती दिवस बँका बंद? यादी आली समोर आली

WhatsApp वरून आयुष्मान कार्ड कसं बनवायचं?

WhatsApp वरून आयुष्मान कार्ड बनवण्यासाठी सर्वप्रथम +91 72908 23838 या अधिकृत Ayushman Sarathi क्रमांक मोबाईलमध्ये सेव करावा. त्यांनतर WhatsApp वर या क्रमांकाला Hi किंवा Hello असा मेसेज पाठवा. चॅटबॉटकडून मिळालेल्या पर्यायांमध्ये Create Ayushman Card हा पर्याय निवडा.

त्यानंतर मोबाईल क्रमांक, आधार क्रमांक किंवा आवश्यक माहिती भरा. नंतर OTP ची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर पात्र लाभार्थ्यांना eKYC पूर्ण करावी लागते. सर्व प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर आयुष्याम कार्ड तयार होईल आणि ते WhatsApp वरूनच डाउनलोड करता येईल.

WhatsApp Ayushman Card
8th Pay Commission : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर, आठव्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट समोर, फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनवर काय निर्णय झाला?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com