

जुलै २०२६ महिन्याची सुरुवात झाली असून, बँकेशी संबंधित महत्त्वाची कामे असलेल्या ग्राहकांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) जाहीर केलेल्या बँक सुट्ट्यांच्या यादीनुसार, जुलै महिन्यात देशातल्या विविध राज्यांमध्ये बँका एकूण १२ दिवस बंद राहणार आहेत. या सुट्ट्यांमध्ये चार रविवार, दुसरा आणि चौथा शनिवार तसेच विविध राज्यातल्या प्रादेशिक सणांचा समावेश आहे.
मात्र या सुट्ट्या संपूर्ण देशभर एकाच दिवशी लागू होणार नाहीत. जुलै महिन्यातील बऱ्याच सुट्ट्या या स्थानिक सणांशी संबंधित असल्यामुळे, ज्या राज्यात संबंधित सण साजरा केला जातो. तिथेच बँका बंद राहतील. त्यामुळे इतर राज्यातल्या बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे. विशेष म्हणजे, जुले महिन्यात असा एकही दिवस नाही, ज्या दिवशी सणामुळे देशभरातली सर्व बँका बंद असतील.
साप्ताहिक सुट्ट्यांमध्ये ५, १२, १९ आणि २६ जुलै हे चार रविवार, तसेच ११ जुलै रोजी दुसरा शनिवार आणि २५ जुलै रोजी चौथा शनिवार असल्याने बँकांना सुट्टी असेल. याशिवाय ६ जुलै रोजी मुहर्रम (आशुरा) निमित्त अनेक राज्यांमध्ये, ९ जुलै रोजी मेघालयात बेह दिंकलाम, १६ जुलै रोजी ओडीशा आणि मणिपूरममध्ये रथयात्रा, १७ जुलै रोजी मेघालयात यू तिरोट सिंग यांच्या पुण्यतिथीनिमित्त आणि २२ जुलै रोजी त्रिपुरामध्ये खर्ची पूजेच्या निमित्ताने बँका बंद राहतील.
तसेच महाराष्ट्रातल्या ग्राहकांसाठी दिलासादायक बाब म्हणजे जुलै महिन्यात साप्ताहिक सुट्ट्यांव्यतिरिक्त कोणतीही बँकेची सुट्टी नाही. त्यामुळे राज्यातल्या बँकांचे कामकाज नियमित सुरू राहणार आहे. बँका बंद असल्या तरी नेट बँकिंग, मोबाईल बँकिंग, यूपीआय आणि एटीएमसारख्या डिजिटल सेवा पूर्ववत सुरू राहतील. पण चेक जमा करणे, रोख रकमेचे व्यवहार किंवा बँकेत जाऊन करावी लागणारी इतर महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण करून घेणे ग्राहकांसाठी जास्त सोयीचे ठरणार आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.