PF Balance Check: वेज सीलिंगनंतर या महिन्यात पगारातून किती PF कापला? घरबसल्या 1 मिनिटात करा चेक

PF Passbook Check: पगारातून या महिन्यात किती पीएफ कापला आणि खात्यात किती जमा झाला, हे घरबसल्या तपासा. EPFOच्या मिस्ड कॉल SMS आणि UMANG Appद्वारे PF पासबुक सहज पाहता येते.
PF Balance Check
PF Balance Checkmeta ai
Published On: 

कर्मचाऱ्यांच्या पगारातून दर महिन्याला ठराविक रक्कम प्रोव्हिडंट फंड म्हणजेच पीएफ खात्यात जमा केली जाते. अलीकडे वेज सीलिंगची मर्यादा १५,००० रुपयांवरून २५,००० करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांच्या पीएफ योगदाबाबत उत्सुकता वाढली आहे. अशावेळी या महिन्यात आपल्या पगारातून नेमका किती पीएफ कापला गेला आणि खात्यात किती रक्कम जमा झाली, हे तपासणं महत्त्वाचं आहे.

EPFO कडून PF बॅलन्स तपासण्यासाठी मिस्ड कॉल, SMS आणि UMANG App असे वेगवेगळे ऑप्शन उपलब्ध आहेत. त्यामुळे ऑफिसमध्ये जाण्याची गरज न पडता घरबसल्या काही मिनिटांत PF खात्याची माहिती मिळवता येते.

मिस्ड कॉलद्वारे PF बॅलन्स तपासा

PF बॅलन्स तपासण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. EPFOच्या माहितीनुसार, नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 9966044425 या क्रमांकावर मिस्ड कॉल द्यावा. काही वेळात SMSद्वारे PF खात्याची माहिती मिळू शकते. यासाठी मोबाइल नंबर PF खात्याशी लिंक असणे आणि UAN सक्रिय असणे आवश्यक आहे.

PF Balance Check
Gold Price Today: पितृपक्षात सोनं झालं स्वस्त; २२,२४ कॅरेट सोन्याचे दरात मोठी घसरण, पाहा तुमच्या शहरातील आजचे रेटस

SMSद्वारे मिळवा PFची माहिती

नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावरून 7738299899 या क्रमांकावर `EPFOHO UAN HIN` असा SMS पाठवता येतो. त्यानंतर EPFOकडून PF खात्याशी संबंधित माहिती SMSद्वारे मिळू शकते.

UMANG Appचा पर्याय

स्मार्टफोनधारक कर्मचारी UMANG App वापरूनही PF बॅलन्स तपासू शकतात. App डाउनलोड करून EPFO विभागात जा आणि View Passbook हा पर्याय निवडा. त्यानंतर UAN क्रमांक आणि OTPच्या मदतीने PF पासबुक पाहता येते.

PF Balance Check
Sleep Problems : सावधान! रात्री अचानक जाग येतेय? या आजाराची असू शकतात लक्षणं

PF पासबुक तपासणे का महत्त्वाचे?

कंपनीने पगारातून PFची रक्कम कापली असली तरी ती वेळेवर खात्यात जमा झाली आहे का, हे तपासणे गरजेचे आहे. त्यामुळे दर महिन्याला PF पासबुक तपासल्यास योगदानातील तफावत किंवा कोणतीही चूक वेळेत लक्षात येऊ शकते. भविष्यातील आर्थिक नियोजनासाठीही PF खात्यावर लक्ष ठेवणं फायदेशीर ठरतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com