SIP investmnet
SIPSaam tv

१०००,२०००,३००० आणि ५००० रुपयांच्या SIPमुळे कधी कोट्यधीश व्हाल? जाणून घ्या गणित

systematic investment plan : १०००,२०००,३००० आणि ५००० रुपयांच्या SIPमुळे तुम्ही कोट्यधीश होऊ शकता. तुम्ही महिना गुंतवणुकीतून कोटी रुपये खात्यात जमा करू शकता. जाणून घ्या तुम्ही कोट्यधीस कसे व्हाल.
Published on

मुंबई : आजच्या काळात अनेकांचं कोट्यधीश व्हायचं स्वप्न असतं. गोरगरीब आणि मध्यम वर्गीय कुटुंबात जन्माला आलेल्या अनेकांना महिन्याला मिळणाऱ्या पगारातून किंवा व्यवसायातील कमाईतून गुंतवणूक करून श्रीमंत व्हायची इच्छा असते. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्यास श्रीमंत होणे नक्कीच शक्य आहे. काहींना सरकारी योजनेत गुंतवणूक करण्याची इच्छा असते. तर काहींना SIPच्या (systematic investment plan)माध्यमाधून गुंतवणूक करून कोट्यधीश होण्याची इच्छा पूर्ण करू शकता. बचतीमध्ये सातत्य ठेवल्यास चांगली रक्कम जमा होऊ शकते.

SIP म्युच्युअल फंडात गुंतवणूक करण्याचाही मार्ग फार सोपा आहे. या योजनेत महिन्याला एक ठराविक रक्कम खात्यातून वजा होते. खात्यातून महिन्याला ठराविक रक्कम वजा होत राहिल्यास बँकेत जमा करण्याचा ताण देखील राहत नाही. सध्या SIP ही योजना गुंतवणूकदारांमध्ये खूपच प्रसिद्ध आहे. या गुंतवणुकीला मोठी पंसती मिळत आहे. डिसेंबरमध्ये म्युच्युअल फंड फोलिओ वाढून २२.५० कोटी रुपये झाला आहे. तर मागील महिन्यात या फंडात २२.०२ कोटी रुपये जमा होते.

SIP investmnet
MPMC Project Investment : पोलिस कर्मचाऱ्यांच्या हक्काच्या घराचे स्वप्न होणार पुर्ण, MPMC प्रकल्पामध्ये 600 कोटींची परदेशी गुंतवणूक

तुम्ही म्युच्युअल फंडात एसआयपीच्या माध्यमातून गुंतवणूक करत असाल तर १०००, २०००, ३००० आणि ५००० रुपये महिना गुंतवणूक करू शकता.

१००० रुपयांच्या SIPने कोट्यधीश कसे व्हाल?

१० टक्के वार्षिक स्टेप अपसोबत १००० रुपयांची महिना गुंतवणूक करू शकता. तसेच वर्षाला १२ टक्के रिटर्न मिळण्याची शक्यता आहे. तुमचे ३१ वर्षात १.०२ कोटी रुपये जमा होऊ शकतात. तुम्ही एकूण २१.८३ लाख रुपयांची गुंतवणूक केली. त्यानंतर तुम्हाला ७९.९५ लाख रुपये रिटर्न मिळू शकतात.

२००० रुपये SIPने काय फायदा होईल?

तुम्ही महिन्याला २००० रुपयांची SIP सुरु केली. त्यानंतर वर्षाला १० टक्के गुंतवणूक वाढवल्यास २७ वर्षात गुंतवणूक १.१५ कोटी रुपये होईल. तसेच तुम्हाला अंदाजे १२ टक्के रिटर्न मिळू शकतात. त्यानुसार, तुमची गुंतवणूक २९.०६ लाख रुपये होईल. त्यानंतर तुम्हाला मिळणारा कॉर्पस हा ८५.६९ लाख रुपये होईल.

SIP investmnet
Investment Tip: पैशाची गुंतवणूक करायची तर डोक्यात ठेवा 'हा' फॉर्म्युला

३००० रुपयांच्या SIPच्या गुंतवणुकीने कोट्यधीश व्हाल का?

तुम्ही ३००० रुपयांची SIP सुरु करू शकता. तसेच या गुंतवणुकीत वर्षाला १० टक्के वाढ करू शकता. या गुंतवणुकीत तुम्हाला अंदाजे १२ टक्के रिटर्न मिळू शकतो. त्यानुसार २४ वर्षांत तुम्हाला १.१० कोटी रुपये मिळतील. तुमची एकूण गुंतवणूक ३१.८६ लाख रुपये असेल. तर तुम्हाला परतावा ७८.६१ लाख रुपयांचा मिळेल.

SIP investmnet
Torres Investment Scam: '२५ दिन मे पैसा डबल'ला बळी पडू नका; टोरेस सारख्या Scam पासून वाचण्यासाठी अशी काळजी घ्या

५००० रुपयांच्या गुंतवणुकीत काय फायदा होईल?

तुम्ही महिन्याला ५००० रुपयांची SIP करू शकता. तसेच या SIP गुंतवणुकीमध्ये १० टक्क्यांची वाढ करावी लागेल. त्यानंतर २१ वर्षांनी १.१६ कोटी रुपये जमा होईल. या माध्यमातून १२ टक्के रिटर्न मिळेल. तुमच्या गुंतवणुकीचे एकूण ३८.४० लाख रुपये जमा होतील. त्यानंतर तुम्हाला रिटर्न ७७.९६ लाख रुपये मिळतील.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com