Hindenburg Research : भारतात काहीतरी मोठं होणार! अदानींनंतर कुणाचा नंबर? हिंडेनबर्गचा इशारा

Hindenburg Research Warning Something Big Soon In India: भारतात काहीतरी मोठं होणार असल्याची माहिती मिळत आहे. कारण हिंडेनबर्ग अहवालातून धक्कादायक माहिती समोर आलीय.
हिंडेनबर्ग अहवालातून धक्कादायक माहिती
AdaniSaam Tv
Published On

मुंबई : भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे, अशी माहिती हिंडेनबर्गने नव्या अहवालातून दिलीय. X वर पोस्ट करत हिंडेनबर्गने भारतीय कंपनीशी संबंधित आणखी एक मोठा खुलासा करण्याचे संकेत दिले आहेत. हिंडेनबर्ग रिसर्चने आपल्या पोस्टमध्ये 'भारतात लवकरच काहीतरी मोठं घडणार आहे' असं लिहिलंय. मात्र, नेमकं काय होणार आहे? याबाबत हिंडेनबर्गने कोणताही अधिकृत खुलासा केलेला नाही.

अदानीनंतर कुणाचा नंबर?

जानेवारी २०२३ मध्ये हिंडेनबर्ग रिसर्चने गौतम अदानी यांच्या अदानी समूहासंदर्भात एक अहवाल प्रसिद्ध केला होता. या अहवालाने मोठी खळबळ उडवून दिली होती. कारण हिंडेनबर्गने अदानी समूहावर अनेक गंभीर आरोप केले होते. हिंडेनबर्ग संशोधन अहवाल समोर येताच, अदानी समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. गौतम अदानी जगातील दुसऱ्या क्रमांकाचे अब्जाधीश होते. परंतु त्यानंतर त्यांच्या संपत्तीत मोठी घट झाल्याचं दिसून (Hindenburg Research) आलं होतं.

हिंडेनबर्ग अहवालातून धक्कादायक माहिती

२४ जानेवारी २०२३ रोजी अदानी समूहाचा अहवाल आला होता. त्यानंतर सर्व शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. कंपनीचे मूल्यांकनही वेगाने घसरले होते. अदानी समूहाचे मूल्यांकन काही दिवसात ८६ अब्ज डॉलरने कमी झाले (Adani) होते. शेअरच्या किमतीत झालेल्या या मोठ्या घसरणीनंतर अदानी समूहाच्या परदेशात सूचीबद्ध बाँडची मोठ्या प्रमाणावर विक्री झाली होती.

हिंडेनबर्ग अहवालातून धक्कादायक माहिती
Adani Hindenburg case : 'हिंडेनबर्ग अहवाल योग्य मानता येणार नाही', अदानी प्रकरणात सुप्रीम कोर्टाने काय म्हटले?

शेअरच्या किमतीत लक्षणीय घट

यावर्षी जून महिन्यात हिंडेनबर्ग रिसर्च पुन्हा एकदा चर्चेत आलाय. भांडवली बाजार नियामक सेबीने त्यांच्यावर भारतीय नियमांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत नोटीस जारी केली होती. हिंडनबर्ग रिसर्चने आपल्या अहवालात प्रथमच कोटक बँकेची स्पष्टपणे ओळख केली (hindenburg news) होती. या खुलाशांमुळे कोटक बँकेच्या शेअरच्या किमतीत लक्षणीय घट झाली होती. शेअर्सने सुरुवातीच्या ट्रेडिंग सत्रात जूनपासून नीचांकी पातळी गाठली होती.

हिंडेनबर्ग म्हणाले की, भारतीय बाजार नियामकाने २७ जून २०२४ रोजी जारी केलेली नोटीस 'बकवास' आहे. भारतातील बड्या लोकांनी केलेला भ्रष्टाचार आणि फसवणूक उघड करणाऱ्यांना गप्प करण्याचा आणि धमकावण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं त्यांनी म्हटलं (Stock Market News) होतं. कोटक महिंद्रा इन्व्हेस्टमेंट्स लिमिटेडमध्ये किंगडन कॅपिटलने महत्त्वपूर्ण गुंतवणूक केल्याचं सेबीच्या नोटीसमधून समोर आलंय. किंग्डन कॅपिटलने अलीकडील अहवालामुळे बाजारातील अस्थिरतेचा फायदा घेतल्याचे दिसून आलंय, अशी माहिती आजतकच्या हवाल्यानुसार मिळत आहे.

हिंडेनबर्ग अहवालातून धक्कादायक माहिती
Adani Hindenburg Case: अदानी समुहाला मोठा दिलासा; हिंडनबर्ग प्रकरणात सुप्रीम कोर्टाकडून दिलासा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com