EMI होणार कमी, HDFC बँकेचा ग्राहकांना मोठा दिलासा! कर्जावरील व्याजदरात कपात

HDFC Bank MCLR Rate Decreases: एचडीएफसी बँकेने ग्राहकांना मोठा दिलासा दिला आहे. त्यांनी MCLR दर कमी केले आहेत. यामुळे कर्जावरील ईएमआयदेखील कमी होणार आहे.
HDFC
HDFCSaam Tv
Published On

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने काही दिवसांपूर्वी रेपो रेट कमी करण्याचा निर्णय घेतला होता. रेपो रेट कमी झाल्यानंतर आपोआप बँका कर्जावरील व्याजदर कमी करणार आहे. दरम्यान, आता एचडीएफसी बँकेने ग्राहकांना दिलासा दिलासा आहे. एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.

HDFC
SBI Bank: 3 वर्षात पैसा होणार डबल! SBI च्या मालामाल करणाऱ्या 'या' ५ स्कीम कोणत्या?

एचडीएफसी बँकेने MCLR मध्ये ०.५० टक्क्यांनी कपात केली आहे. यामुळे कर्जावरील व्याजदर कमी होणार आहे. यामुळे गृहकर्ज, कार लोन आणि पर्सनल लोनचे ईएमआय कमी होणार आहे. हे नवीन व्याजदर कालपासून म्हणजेच ७ मार्चपासून लागू केले आहेत. हा MCLR रेट २ वर्षांसाठी कमी केला आहे.

एचडीएफसी बँकेने १ महिना, ओव्हरनाईट, ३, ६ महिने १ वर्षांच्या कालावधीसाठी MCLR रेट कायम ठेवला आहे. हा MCLR रेट ९.४५% वरून ९.४०% करण्यात आला आहे. त्यामुळे लोनचे ईएमआय कमी होणार आहेत. गेल्या ३ वर्षांच्या कालावधीच या दरात कोणताही बदल करण्यात आला नव्हता.

HDFC
RBI Repo Rate : रेपो रेट कमी झाले, आता होणार हे ५ फायदे; तुमच्या कर्जाच्या EMI वर काय झाला परिणाम? वाचा

जेव्हा बँक MCLR कमी करते तेव्हा होम लोन, पर्सनल लोनच्या व्याजदरावर परिणाम होतो. त्यामुळे ईएमआयकमी भरावा लागेल. यामुळे ग्राहकांना फायदा होणार आहे.MCLR च्या आधारावर कर्जावरील व्याजदर ठरवले जातात. याशिवाय बँकांच्या एफडीचे व्याजदर, रोख राखीव प्रमाण, ऑपरेशनल खर्च या घटकांवर MCLR ठरवला जातो. यामुळे कर्ज स्वस्त होते. याउलट MCLR वाढल्यावर कर्ज महाग होते. व्याजदर वाढते.

एचडीएफसी बँकेच्या या निर्णयामुळे कर्जदारांना फायदा होणार आहे. हा बदल २ वर्षांसाठी असणार आहे. त्यामुळे जास्त कालावधीसाठी कर्ज घेतलेल्यांना फार फायदा होणार नाही.

HDFC
Pashu Aushadhi scheme: गुरांनाही मिळणार स्वस्तात औषध! सरकारच्या 'पशुवैद्यक केंद्रा'चा कसा घेणार लाभ?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com