

केंद्र सरकारसोबत अनेक राज्यातल्या सरकारने अनेक योजना राबवल्या आहे. तर रक्षाबंधनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने महिलांसाठी मोठी घोषणा केली आहे. ज्याप्रमाणे महाराष्ट्रात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवली जाते, तशीच दिल्लीमध्ये लक्ष्मी योजना राबवली जाणार आहे. या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यात दरमहा २५०० आर्थिक सहाय्य थेट जमा केले जाणार आहे.
सरकारने दिलेल्या माहितीनुसार, या योजनेचा लाभ देण्यासाठी विशेष डिजिटल पोर्टल तयार करण्यात आलं आहे. हे पोर्टल १ ऑगस्ट २०२६ पासून सुरू होणार असून, त्याच्यामध्ये पात्र असणाऱ्या महिला ऑनलाइन अर्ज करू शकणार आहेत. अर्ज आणि पडताळणी प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर रक्षाबंधानपर्यंत पहिल्या टप्प्यातील लाभार्थींनी पहिला हप्ता देण्याचा सरकारचा प्रयत्न आहे.
योजना मंजूर झाल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी आनंद व्यक्त करत सांगितलं की, दिल्लीतल्या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी सरकारने दिलेलं आश्वासन पूर्ण केलं आहे. महिलांना रोजच्या रोज आर्थिक मदत मिळाल्याने त्यांच्या दैनंदिन गरजा आणि कुटुंबाच्या खर्चाला हातभार लागेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
अर्जदार महिलेचे वय २१ ते ६० वर्षे दरम्यान असायला हवे.
महिला किंवा तिचे कुटुंब किमान १० वर्षांपासून दिल्लीचे कायमस्वरूपी रहिवासी असायला हवे.
कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न २.५ लाखांपेक्षा कमी असावे.
एका कुटुंबात एकापेक्षा जास्त पात्र महिला असल्यास सर्वात जेष्ठ महिलेलाच योजनेचा लाभ दिला जाईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.