सरकारी कर्मचारी-पेन्शनर्स सावधान! ₹3,000 पेक्षा जास्त मेडिकल टेस्टसाठी आता रेफरल बंधनकारक; जाणून घ्या नवा नियम

Government Employees and Pensioners Alert : केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी CGHS मेडिकल क्लेमचे नियम स्पष्ट झालं आहे. ३००० रुपयांपेक्षा जास्त तपासण्यांसाठी रेफरल आवश्यक असून कन्सलेटशन सात दिवस वैध आहे.
Government Employees
Government Employees meta ai
Published On

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी CGHS Central Government Health Scheme) अंतर्गत मेडिकल क्लेम आणि रिइम्बर्समेंटच्या नियमांबद्दल महत्त्वाचं स्पष्टीकरण समोर आलं आहे. डॉक्टरांची कन्सल्टेशन, मेडिकल टेस्ट, रेफरल आणि विविध तपासण्यांसंदर्भातले नियम CGHS ने स्पष्ट केले आहेत. नियमांची माहिती नसले तर मेडिकल क्लेमच्या परताव्यात अडचणी येऊ शकतात.

CGHS च्या ११ ऑगस्ट २०२६ रोजीच्या ऑफिस मेमोरेंडममध्ये या नियमांची माहिती देण्यात आली आहे. UPSC ने मडिकल क्लेमच्या तपासणीदरम्यान वारंवार निर्माण होण्याऱ्या अडचणींबाबत CGHS कडे स्पष्टीकरण मागितलं होतं.

Government Employees
Gold Price Today: सणासुदीआधी सोन्याचा मोठा झटका! 24K सोनं पोहोचलं ₹1,55,890 वर, वाचा तुमच्या शहरातला नवा दर

३००० रुपयांपर्यंतच्या तपासणीसाठी महत्त्वाचा नियम

जर एखाद्या लाभार्थ्याने CGHS एम्पॅनल्ड रुग्णालयातले तज्ज्ञ डॉक्टरांकडून कन्सल्टेशन घेतलं आणि डॉक्टरांनी ३००० रुपयांपर्यंतची तपासणी सुचवली, तर ही तपासणी त्याच रुग्णालयात करावी लागेल. उदाहरणार्थ २५०० ची रक्त तपासणी लिहिल्यावर ती त्याच रुग्णालयात करावी लागेल. दुसऱ्या CGHS एम्पॅनल्ड रुग्णालयात किंवा डायग्रोस्टिक सेंटरमध्ये तपासणी करायची असेल तर CGHS वेलनेस सेंटरकडून आवश्यक रेफरल किंवा एंडोर्समेंट घ्यावं लागू शकतं.

Government Employees
Chandra Grahan Horoscope: चंद्रग्रहणानंतर नशीब बदलणार! ‘या’ 3 राशींवर धनवर्षाव अन् करिअरमध्ये प्रगती होणार; जाणून घ्या कोणत्या?

३००० रुपयांपेक्षा जास्त तपासणीसाठी रेफरल

CT स्कॅन, एमआरआय आणि पीईटी स्कॅनसारख्या महागड्या तपासण्यांसाठी निर्धारित CGHS प्रोसेसनुसार रेफरल आवश्यक आहे. त्यामुळे तपासणी करण्याआधी संबंधित वेलनेस सेंटर किंवा विभागाकडून प्रोसेस स्पष्ट करून घेणं महत्त्वाचं आहे.

कन्सल्टेशन ७ दिवस वैध

CGHS अंतर्गत कन्सल्टेशनची वैधता ७ दिवसांची असून ती त्याच स्पेशालिटीशी संबंधित असणे आवश्यक आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार नवीन कन्सल्टेशन घ्यावं लागू शकतं.

डोळ्यांच्या तपासणीचेही नियम स्पष्ट

डोळ्यांच्या तपासणीमध्ये रिफ्रेक्शन, टोनोमेट्री आणि फंड्स तपासणी या तीन प्रोसेसचा समावेश मानला जातो. तसेच CGHS च्या निर्धारित यादीत नसलेली तपासणी किंवा मेडिकल प्रोसीजर डॉक्टरांनी सुचवल्यावर ची करण्यापूर्वी संबंधित विभाग किंवा कार्यालयाची पूर्वपरवानगी घेणं आवश्यक आहे.

त्यामुळे कर्मचारी आणि पेन्शनर्सनी मेडिकल तपासणीआधी रेफरल, पूर्वपरवानगी आणि संबंधित कागदपत्रे व्यवस्थित जपून ठेवणं महत्त्वाचं आहे. यामुळे भविष्यात मेडिकल रिइम्बर्समेंट क्लेम करताना अडचणी टाळता येऊ शकतात.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com