EPFO: पीएफ खातेदारांसाठी मोठा दिलासा! 7 लाखांचे मोफत विमा संरक्षण कायम, नव्या नियमांमुळे मिळणार आणखी लाभ

EPFO EDLI Scheme 2026 : ईपीएफओच्या नव्या EDLI नियमांमुळे पीएफ खातेदारांना ७ लाखांचा विमा संरक्षण कायम राहणार आहे. ऑनलाइन क्लेम, जलद प्रक्रिया आणि कुटुंबांना जास्त आर्थिक सुरक्षिततेचा मोठा लाभ मिळणार आहे.
PF account holders
PF account holdersgoogle
Published On

कर्मचारी भविष्य निधी संघटना (EPFO) अंतर्गत असलेल्या कोट्यवधी पीएफ खातेदारांसाठी केंद्र सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. EDLI Scheme 2026 अंतर्गत करण्यात आलेल्या नव्या नियमांमुळे कर्मचाऱ्यांच्या कुटुंबांना जास्त आर्थिक सुरक्षा मिळणार आहे. या नव्या नियमांची अंमलबजावणी २९ जून २०२६ पासून देभरात सुरू झाली आहे.

नव्या नियमांनुसार, कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला मिळणारा ७ लाखांचा विमा संरक्षण कायम ठेवण्यात आला आहे. याशिवाय, पीएफ खात्यातली शिल्लक रकमेच्या आधारे जास्तीत जास्त १ लाखांचा जास्तीचा भाव देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

PF account holders
EPFO Update: PF खात्यावर ८.२५ टक्के व्याज जमा होण्यास सुरूवात, तुम्हाला मिळाले का? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप

सरकारने आणखी एक महत्त्वाचा बदल केला आहे. जर एखाद्या कर्मचाऱ्याचा पीएफमधला शेवटचा हप्ता भरल्यानंतर सहा महिन्यांच्या आत मृत्यू झाला, तरीही त्याच्या कुटुंबाला EDLI योजनेचा विमा लाभ मिळू शकणार आहे. त्यामुळे बऱ्याच कुटुंबांना आर्थिक आधार मिळणार आहे.

विमा दाव्यांच्या प्रक्रियेलाही जास्त वेग देण्यात आला आहे. आवश्यक कागदपत्रांसह दावा दाखल केल्यानंतर २० दिवसांच्या आत क्लेम निकाली काढणं बंधनकारक करण्यात आले आहे. विनाकारण उशीर झाल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर १२ टक्के वार्षिक व्याजाचा दंड आकारला जाऊ शकतो.

याशिवाय, संपूर्ण प्रक्रिया जास्त पारदर्शक करण्यासाठी EPFO प्रणाली पूर्णपणे डिजिटल करण्यात आली आहे. रिटायरझालेल्यांना विमा निधीचं योगदान आणि शुल्क ऑनलाइन भरावं लागणार असून, विमा दावा दाखल करण्याची प्रक्रिया सुद्धा ऑनलाइन करण्यात आली आहे. या नव्या नियमांमुळे पीएफ खातेदार आणि त्यांच्या कुटुंबांना जास्त आर्थिक संरक्षण मिळणार असेन, दावा प्रक्रिया सुद्धा जास्त जलद आणि सोपी होणार आहे.

PF account holders
Indian Railways : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! WhatsApp वरचं तिकीट दाखवून प्रवास करता येणार नाही, हे कागदपत्रेसोबत असणे अनिवार्य

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com