

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) च्या लाखो सदस्यांसाठी मोठी दिलासादायक बातमी आहे. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी निश्चित करण्यात आलेले ८.,२५ टक्के व्याज सदस्यांच्या पीएफ खात्यात १५ जुलै २०२६ पर्यंत जमा होणार आहे. ही माहिती केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली आहे.
EPFO दरवर्षी आर्थिक वर्षासाठी व्याजदर जाहीर करतं. आर्थिक वर्ष २०२५-२६ साठी ८.२५ टक्के व्याजदर निश्चत करण्यात आलं आहे. सदस्यांच्या पीएफ खात्यात वर्षभर असलेल्या शिल्लक रकमेच्या आधारावर हे व्याज मोजलं जाणार आहे. जुन्या कर प्रणालीअंतर्गत, आयकर कायद्यातले कलम ८० C नुसार ठरावीक अटी पूर्ण केल्याने पीएफवरचे व्याज टॅक्सफ्री राहतं.
मंत्री मनसुख मांडविया यांनी सांगितलं की, EPFO ने आर्थिक वर्ष २०२५-२६ चे व्याज सजस्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. आवश्यक पडताळणीनंतर हे व्याज १५ जुलै २०२६ पर्यंत पासबुकमध्ये दिसायला सुरुवात होईल.
तुमच्या पीएफ खात्यात जमा व्याज पाहायचं असेल तर सर्वात आधी EPFO च्या अधिकृत वेबसाइटवर जा. मग View या ऑप्शनवर क्लिक करून Passbook निवडा. तुमचा UAN आणि पासवर्ड वापरून लॉगिन करा. पुढे तुम्हाला Member ID हा पर्याय दिसेल तिथेच View Passbook वर क्लिक करा. त्यानंतर संपूर्ण व्यवहारांचा तपशील आणि जमा झालेलं व्याज पाहता येईल.गरज असल्यास Download PDF या पर्यावरून तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.