Google च नवं फीचर! प्रवास होणार आणखी सोप्पा, पेट्रोल आणि पैसेही वाचणार

Google Map New Feature: गुगल मॅप प्रवाशांना नेहमी सोपा मार्ग दाखवतात. गुगल मॅपचा वापर करुन आपण आपल्या ठिकाणावर लवकरात लवकर पोहचतो. आता गुगल अॅपने ग्राहकांसाठी नवीन फिचर लाँच केले आहे.
Google Map
Google Map Saam Tv
Published On

Google Map Fuel Saving Feature:

गुगल मॅप हे एक नेव्हिगेशन अॅप आहे. गुगल मॅपवरुन आपण सहज सोप्या मार्गाने प्रवास करु शकतो. गुगल मॅप प्रवाशांना नेहमी सोपे आणि शॉटकट मार्ग दाखवतात. गुगल मॅप नेहमीच प्रवाशांना चांगला अनुभव मिळण्यासाठी नवनवीन फिचर लाँच करत असतात. कंपनीने नुकतेच Fuel Saving फिचर लाँच केले आहे.

याआधी हे फिचर अमेरिका, कॅनडा आणि युरोपीयन देशांमध्ये होते. आता भारतात हे फिचर लाँच करण्यात आले आहे. या फिचरच्या मदतीने प्रवासी किती टक्के इंधनाची बचत करतात हे कळणार आहे.

मार्ग होणार कॅलक्युलेट

प्रवासी या फिचरचा वापर करुन इंधनाची बचत किती होते ते पाहू शकणार आहेत. या फिचरमुळे युजर्संना मार्ग, रहदारी, रस्त्याची स्थिती आणि किलोमीटर कॅलक्युलेट करेल. यानंतर अॅप तुम्हाला सर्वात सोपा आणि इंधनाची बचत करणारा मार्ग दाखवेल. तसेच गुगल मॅप इतर मार्ग दाखवतील.

गुगल मॅपमध्ये Fuel Saving पर्याय कसा चालू करायचा?

गुगल मॅपमध्ये Fuel Saving पर्याय चालू करण्यासाठी सर्वप्रथम फोनमध्ये गुगल मॅप्स ओपन करा. त्यानंतर प्रोफाइल पिक्चर आयकॉनवर क्लिक करा. त्यानंतर सेटिंग्समध्ये आणि नेव्हिगेशनवर क्लिक करा. यानंतर Route पर्याय स्क्रोल करा. त्यानंतर Prefer fuel Efficient Routes ऑन करा. यासाठी फोनमध्ये सर्वप्रथम हे फिचर ऑन करा. (Google Map Feature)

Google Map
Business Idea In Marathi : चमचमीत पदार्थ बनवता येताय? मग महिन्याला कमवू शकता लाखो रुपये; फक्त १० हजार रुपयांची गुंतवणूक करा

युजर्स जेव्हा गुगल मॅप्सचा (Google Map) वापर करतील तेव्हा त्यांना सर्वात सोपा आणि कमी इंधन लागणार मार्ग दिसेल. यामध्ये तुम्हाला ३ मार्गांचे पर्याय मिळतील.तसेच तुमची जवळपास ५ टक्के इंधनाची बचत होईल असे सांगण्यात येत आहे.

Google Map
Gold Silver Rate Hike: सोनं १२०० रुपयांनी महागलं, तर चांदीच्या दरातही ३००० रुपयांची वाढ; चेक करा नवे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com