PM Kisan Yojana : २४ व्या हप्त्याबाबत मोठी बातमी समोर; 'या' शेतकऱ्यांनाच मिळणार ₹२०००, महत्त्वाची अपडेट समोर

PM Kisan 24th installment Date : पीएम किसान योजनेच्या २४व्या हप्त्याची शेतकरी वाट पाहत आहेत. चार महिन्यांच्या अंतरानुसार ऑक्टोबरमध्ये २००० रुपये मिळण्याची शक्यता आहे.
PM Kisan Yojana
PM Kisan Yojana meta ai
Published On

शेतकऱ्यांना सरकार नेहमीच मदत करत असतं. शेतीच्या कामासाठी शेतकऱ्यांना आर्थिक बाबतीत अडचणी येऊ नयेत म्हणून सरकारने काही योजना सुरू केल्या आहेत.त्यातीलच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा (PM-KISAN) लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना वर्षाला ६००० रुपयांची आर्थिक मदत दिली जाते. ही रक्कम २००० रुपयांच्या तीन समान हप्त्यांमध्ये थेट बँक खात्या जमा केली जाते.

पीएम किसान योजनेचा २३ वा हप्ता २० जून २०२६ रोजी जारी करण्यात आला होता. या हप्त्याअंतर्गत ९.४४ कोटींपेक्षा जास्त शेतकऱ्यांना एकूण १८,८८० कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम DBTच्या माध्यमातून देण्यात आली.

PM Kisan Yojana
Eye Health : चष्मा कायमचा निघेल! रोज रात्री झोपण्यापूर्वी 'ही' एक गोष्ट खा

आता शेतकऱ्यांचे लक्ष २४ व्या हप्त्याकडे लागले आहे. योजनेच्या हप्त्यांमध्ये साधारण चार महिन्यांचे अंतर असल्याने ऑक्टोबर २०२६ मध्ये २४वा हप्ता येण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. मात्र केंद्र सरकारकडून २४व्या हप्त्याची निश्चित तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. त्यामुळे सोशल मीडियावर किंवा व्हायरल मेसेजमध्ये दिलेली अधिकृत समजू नये.

PM Kisan Yojana
Gold Price Today: सोन्याच्या दरात आठवडाभरात सर्वात मोठा बदल, खरेदी करण्यापूर्वी वाचा 18, 22 आणि 24 कॅरेटचे दर

२४ व्या हप्त्यात किती पैसे मिळणार?

पात्र लाभार्थ्यांना नेहमीप्रमाणे २,००० रुपयांचा हप्ता मिळण्याची अपेक्षा आहे. मात्र, त्यासाठी शेतकरी योजनेच्या पात्रता निकषांची पूर्तता करत असणे आवश्यक आहे.

e-KYC पूर्ण आहे का , तपासा

पीएम किसानच्या अधिकृत वेबसाइटनुसार e-KYC अनिवार्य आहे. त्यामुळे २४व्या हप्त्याची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्यांनी आपली e-KYC स्थिती तपासणे महत्त्वाचे आहे. तसेच बँक खातं, आधारशी संबंधित माहिती आणि योजनेतील नोंदी योग्य आहेत का, हेही तपासावे.

एकूणच, २३वा हप्ता जूनमध्ये मिळाल्यानंतर आता ऑक्टोबरकडे शेतकऱ्यांचे लक्ष आहे. मात्र २४व्या हप्त्याची अधिकृत तारीख जाहीर होईपर्यंत कोणतीही संभाव्य तारीख अंतिम मानू नये.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com