Sakshi Sunil Jadhav
आजकाल सतत मोबाईल, कॉम्प्युटर आणि टीव्ही स्क्रीनकडे पाहिल्यामुळे डोळ्यांवर ताण येण्याचे प्रमाण वाढले आहे. डोळ्यांचे आरोग्य चांगले ठेवण्यासाठी आहारात पोषक पदार्थांचा समावेश करणं महत्त्वाचं आहे. अशाच एका घरगुती मिश्रणाबद्दल जाणून घेऊया.
डोळ्यांचे आरोग्य टिकवण्यासाठी जीवनसत्त्वे, खनिजे आणि अँटीऑक्सिडंट्स असलेल्या पदार्थांचा आहारात समावेश करणे फायदेशीर ठरू शकते.
बदामामध्ये व्हिटॅमिन E आणि इतर पोषक घटक असतात, जे डोळ्यांच्या आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकतात.
बडीशेपमध्ये अँटीऑक्सिडंट्स आढळतात आणि पारंपरिक आहारपद्धतींमध्ये तिचा डोळ्यांच्या आरोग्यासाठी वापर केला जातो.
धाग्याची मिश्री या मिश्रणाची चव वाढवण्यासाठी वापरली जाते. मात्र तिचे सेवन मर्यादित प्रमाणात करणे योग्य आहे.
बदाम, बडीशेप आणि धाग्याची मिश्री समान प्रमाणात घेऊन मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर तयार करा.
तुम्ही या पावडरचा एक चमचा कोमट दुधासोबत रात्री झोपण्यापूर्वी घेण्याची पद्धत सांगितली जाते.
हे मिश्रण डोळ्यांना पोषक घटक देऊ शकते. मात्र यामुळे चष्म्याचा नंबर कमी होतो किंवा दृष्टी निश्चितपणे सुधारते, याचे पुरेसे वैज्ञानिक पुरावे नाहीत.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी केवळ आहारावर अवलंबून न राहता स्क्रीनपासून नियमित ब्रेक घेणे आणि पुरेशी झोप घेणेही महत्त्वाचे आहे.