Gold vs Silver Investment: सोने की चांदी? १ लाखांच्या गुंतवणुकीवर कोण बनलं पैशांचं मशीन? आकडे पाहून बसेल धक्का

Gold or Silver: सोनं की चांदी, गुंतवणुकीसाठी कोणता पर्याय चांगला आहे हे जाणून घेण्यासाठी सविस्तर माहिती जाणून घ्या.
Gold vs Silver Investment
Gold vs Silver Investment saam tv
Published On: 

भारतीय कुटुंबांमध्ये सोनं आणि चांदीला फक्त दागिन्यांपुरतं महत्त्व नाही, तर गुंतवणुकीचा एक सुरक्षित पर्याय म्हणूनही पाहिलं जातं. गेल्या काही वर्षातल्या आकडेवारीनुसार सोनं आणि चांदी या धातूंनी गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला. पण कोणत्या धातूमध्ये गुंतवणूक केल्याने जास्त फायदा झाला? एक लाख रुपयांची गुंतवणूक केली असती तर आज किती पैसे मिळाले असते, हे सविस्तर जाणून घेऊया.

सोने की चांदी, कशातून मिळतो जास्त परतावा?

इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन (IBJA) च्या ९९९ शुद्धतेच्या सोनं आणि चांदीच्या बेंचमार्क दरांनुसार, मागच्या एका वर्षात चांदीने सोन्यापेक्षा चांगली कामगिरी केली. चांदी एक वर्षाआधी केलेली १ लाख रुपयांची गुंतवणूक वाढून सुमारे १.१८ लाख रुपये झाली असती. सोनं सोन्यातली १ लाख रुपयांची गुंतवणूक वाढून सुमारे १.१४ लाख रुपये झाली असती. म्हणजेच एका वर्षात चांदीने सोन्यापेक्षा जास्त परतावा दिला.

Gold vs Silver Investment
BSNL Recharge Plans : मोठी बातमी! फक्त ₹१७२ मध्ये महिनाभर बिनधास्त कॉलिंग! पाहा कोणता प्लॅन फायदेशीर

तीन वर्षांत चांदीने मारली बाजी!

तीन वर्षांच्या गुंतवणुकीचा विचार केला तर चांदीचा परतावा जास्त प्रभावी ठरला आहे. चांदीने सुमारे १४९.२९ टक्के परतावा दिला. म्हणजेच १ लाख रुपये वाढून २.४९ लाख रुपये झाले असते. सोन्याने सुमारे १२५.२६ टक्के परतावा दिला. म्हणजेच १ लाख रुपये वाढून २.२५ लाख रुपये झाले असते.

पाच वर्षांत सोन्याने घेतली आघाडी

पण पाच वर्षांच्या आकडेवारीत चित्र बदललं आहे. या कालावधीत सोन्याने चांदीला मागे टाकलं. सोन्यातली १ लाख रुपयांची गुंतवणूक वाढून २.८८ लाख रुपये झाली असती. चांदीतील १ लाख रुपयांची गुंतवणूक वाढून २.७९ लाख रुपये झाली असती.

Gold vs Silver Investment
DA Hike : सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! पगारात होणार वाढ, ४ महिन्यांचे पैसेही मिळणार; पाहा कोणाला फायदा?

सोने आणि चांदीच्या किमती कशामुळे बदलतात?

डॉलरची स्थिती, व्याजदर, जागतिक तणाव आणि गुंतवणूकदारांची मागणी यांचा दोन्ही धातूंच्या किमतींवर परिणाम होतो. सौरऊर्जा, इलेक्ट्रॉनिक्स आणि इलेक्ट्रिक वाहन उद्योगात चांदीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असल्याने तिची औद्योगिक मागणी वाढते. त्यामुळे चांदीच्या किमतीत वेगाने वाढ होऊ शकते. मात्र, तिच्यात चढ-उतारही जास्त असतात. दुसरीकडे, आर्थिक अनिश्चिततेच्या काळात सोनं सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय मानला जातो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.