मार्च महिना सुरु झाल्यापासून सोन्या-चांदीच्या भावात वाढ झालेली पाहायला मिळाली. मार्च महिन्यात सोन्याच्या भावाने २३०० रुपयांनी उसळी घेतली तर चांदीच्या दरात दोन हजार रुपयांनी वाढले.
१ मार्चपासून सोन्याचे भाव वाढताना दिसून आले आहे. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोन्याचे दर वाढल्याने ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागणार आहे. आज सकाळच्या सत्रात सोन्याच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळाली.
१ मार्चपासून ते ६ मार्चपर्यंत २३०० रुपयांनी वाढ झाली आहे. यापूर्वी सोन्याच्या दराने डिसेंबर २०२३ मध्ये उच्चांकाची पातळी गाठली होती. आज सोन्याच्या भावाने ६५ हजारांचा आकडा पार केला आहे. जाणून घेऊया मुंबई-पुण्यातील आजचा भाव
आज गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,०२५ रुपये मोजावे लागणार आहे. २२ कॅरेटनुसार सोन्याच्या (Gold) भावात ४०० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६५,७१० रुपये मोजावे लागतील. आज सोन्याच्या भावात ४३० रुपयांनी वाढ झाली आहे. तसेच चांदीच्या किमतीतही (Price) घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७४,४०० रुपये मोजावे लागतील. चांदीच्या भावात प्रतिकिलोनुसार १०० रुपयांनी घसरण झालीये. (Gold Silver Price Today In Marathi)
मुंबई- ६५,५६० रुपये
पुणे - ६५,५६० रुपये
नागपूर - ६५,५६० रुपये
नाशिक - ६५,५९० रुपये
ठाणे - ६५,५६० रुपये
अमरावती - ६५,५६० रुपये
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.