Today's Gold Silver Rate: सोन्याचा उच्चांक, चांदीच्या भावात वाढ; जाणून घ्या आजचे दर

(30th March 2024) Gold Silver Price In Maharashtra: मार्च महिन्यात सोन्या-चांदीची घौडदोड सुरुच आहे. अशातच मागच्या काही दिवसांपासून तेजीचे सत्र सुरु आहे.
Today's Gold Silver Rate
Today's Gold Silver RateSaam Tv

24k Gold Silver Rate In Maharashtra:

मार्च महिन्यात सोन्या-चांदीची घौडदोड सुरुच आहे. अशातच मागच्या काही दिवसांपासून तेजीचे सत्र सुरु आहे. काल शुक्रवारी एकाच दिवसात सोन्याच्या भावात हजार रुपयांनी वाढ झाली. त्यामुळे सोने रेकॉर्ड ब्रेक दरावर पोहोचले.

काल सोन्याच्या भाव ६८ हजार ६०० रुपये प्रति तोळा होता. एक तोळा सोन्यासाठी ३ टक्के जीएसटीसह ७०,६५८ रुपये मोजावे लागले. चांदीच्या भावात ५०० रुपयांनी वाढ होऊन ती ७५,५०० रुपये किलोवर पोहोचली.

1. सोन्याचा भाव का वाढतोय?

अमेरिकन बँकांची स्थिती खराब असल्यामुळे मार्चच्या सुरुवातीपासून सोन्याचे भाव वाढू लागले आहे. मागच्या आठवड्यात सोन्याचा भाव ६७ हजारांच्या टप्प्यावर पोहोचले. अमेरिकन बँकांची स्थिती सुधारत नसल्यामुळे व्याजदर आणखी कमी केल्याने मोठ्या प्रमाणात सोन्यामध्ये गुंतवणूक केली जात आहे. हे दरवाढीचे सत्र कायम राहिल्याने दिवाळीपर्यंत सोन्याचा भाव ७५ हजारांपर्यंत पोहोचू शकतो असे मत सराफ बाजारातील व्यापाऱ्यांनी व्यक्त केले आहे.

Today's Gold Silver Rate
Tax Saving Tips : ७ लाखांच्या टॅक्सवर करता येणार बचत, ITR फाइल करण्यापूर्वी ६ टिप्स लक्षात ठेवा

गुड रिटर्न्सच्या वेबसाइटनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी ६,२९० रुपये तर २४ कॅरेटनुसार १० ग्रॅमसाठी ६८,६०० रुपये (Price) मोजावे लागणार आहे. आज सोन्याच्या (Gold) भावात २८० रुपयांनी घसरण झालेली पाहायला मिळाली आहे. तसेच आज प्रतिकिलो चांदीसाठी (Silver) ७८००० रुपये मोजावे लागतील. तर चांदीच्या भावात २०० रुपयांनी वाढ झाली आहे.

Today's Gold Silver Rate
Professional Tax: तुमच्या पगारातून कापला जाणारा प्रोफेशनल टॅक्स आहे तरी काय? जाणून घ्या सविस्तर

2. २४ कॅरेटनुसार प्रमुख शहरातील आजचा भाव किती? (24k Gold Rate Today)

  • मुंबई- ६८,४५० रुपये

  • पुणे - ६८,४५० रुपये

  • नागपूर - ६८,४५० रुपये

  • नाशिक - ६८,४८० रुपये

  • ठाणे - ६८,४५० रुपये

  • अमरावती - ६८,४५० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com