Gold Silver Price Today (14th November): पाडव्याच्या दिवशी सोन्याला झळाळी, चांदीही चकाकली; जाणून घ्या आजचा भाव

Today's (14th November 2023) Gold Silver Rate In Maharashtra : साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दिवाळी पाडवा. या दिवशी सोनं खरेदी करण्यासाठी विशेष मुहूर्त असतो.
Gold Silver Price Today (14th November)
Gold Silver Price Today (14th November)Saam Tv
Published On

Gold Silver Rate In Maharashtra (14th November 2023):

दिवाळीत सोन्याच्या भावात पतझड पाहायला मिळाली. या काळात सोन्या-चांदी खरेदी करण्याचा ग्राहकांचा अधिक कल असतो. सणासुदीच्या काळात भारतात दागिने खरेदी करण्यास अधिक प्राधान्य दिले जाते.

साडेतीन मुहूर्तांपैकी एक असणारा दिवाळी पाडवा. या दिवशी व्यापारीवर्गासाठी नवीन वर्षाची सुरुवात असते. तसेच या दिवशी सोने-चांदी खरेदी करण्यासाठी शुभ मुहूर्त मानला जातो. आज सोन्याच्या दरात किंचित वाढ झालेली पाहायला मिळाली आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

आखाती देशातील युद्धामुळे सोन्याचा दरांने ६२ हजारांचा टप्पा ओलांडला होता. अशातच दिवाळीत सोन्याच्या दरात पतझड पाहायला मिळाली. सोन्याच्या भावात १० ग्रॅमनुसार ११० रुपयांनी वाढ झाली आहे. सणासुदीच्या (Festival) काळात पुन्हा सोन्याच्या दरात वाढ झाल्याने खरेदीदारांना आज जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहे.

Gold Silver Price Today (14th November)
Bhaubeej 2023 : बहीण-भावाच्या अतूट नात्याचा सण भाऊबीज, शुभ मुहूर्त कधी? जाणून घ्या

आंतरराष्ट्रीय बाजारात इस्त्रायल-हमास युद्धाचा परिणाम सोन्या-चांदीच्या भावावर दिसून आला आहे. त्यामुळे मागील महिन्याभरात सोन्याच्या किमतीत चढ- उतार पाहायला मिळाला. गुड रिटर्न्सच्या वेबसाइटसनुसार आज सकाळच्या सत्रात २२ कॅरेटनुसार १ ग्रॅम सोन्यासाठी (Gold) ५,५७० रुपये तर २४ कॅरेटनुसार १ तोळ्यासाठी ६०,७५० रुपये मोजावे लागणार आहे. तर चांदीच्या (Silver) किमतीतही वाढ झाली आहे. आज १ किलो चांदीसाठी ७३,००० रुपये मोजावे लागणार आहेत.

1. मुंबई-पुण्यात आज २४ कॅरेट सोन्यासाठी किती पैसे मोजावे लागतील?

  • मुंबई- ६०, ६०० रुपये

  • पुणे - ६०, ६०० रुपये

  • नागपूर - ६०, ६०० रुपये

  • नाशिक- ६०,६३० रुपये

  • ठाणे - ६०, ६०० रुपये

  • अमरावती - ६०, ६०० रुपये

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com