Gold Investment: सोनं खरेदी करताय? पण त्याआधी ही बातमी वाचाच

Gold Safety Tips: सोन्यातील गुंतवणूक ही कधीच तोट्याची नसते. त्यामुळे तुम्हाला नेहमीच फायदा होता. दरम्यान, घरातील सोनं तितकंच सुरक्षित ठेवणेदेखील गरजेचे असते. त्यासाठी तुम्ही लॉकरचा वापर करु शकतात.
Gold Rate
Gold Rate
Published On

आपल्या भारतीयांमध्ये सोन्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पिढ्यानपिढ्या वारशाने मिळालेले दागिने असोत किंवा अक्षय तृतीया आणि धनत्रयोदशीसारख्या सणांच्या मुहूर्तावर केलेली सोन्याची नवीन खरेदी असो. भारतीयांमध्ये सोन्याला मौल्यवान धातूपेक्षाही जास्त महत्त्व आहे. आजही अनेक घरांमध्ये सोने ठेवणे हे कुटुंबाच्या भावनिक आणि आर्थिक सुरक्षिततेचे प्रतीक मानले जाते. सणोत्सवात सोन्यांतील गुंतवणूक हे समृद्धीचे लक्षण मानले जाते. संकटकाळात हक्काची पुंजी म्हणून सोन्याचा आधार मिळतो. या पिवळ्या धातूशी भारतीयांचे अतूट नाते आहे.

अलीकडच्या काळात सोन्याच्या सुरक्षिततेच मूल्य लक्षणीयरित्या वाढले आहे. २०२५ साली भारतीय सराफा बाजारात सोन्याच्या दरांनी एकामागोमाग एक उच्चांक प्रस्थापित केल्याचे दिसून आले आहे. देशांतर्गत बाजारपेठेत सोन्याच्या किंमतीने प्रति १० ग्रॅम १.३९ लाख रुपयांचा टप्पा ओलांडला असून, ही आतापर्यंतची ऐतिहासिक दरवाढ ठरली आहे. सोन्याच्या दरातील या सातत्यपूर्ण वाढीमुळे भारतीय घरांती सोन्याचे मूल्य कमालीचे वाढले आहे. ही मालमत्ता आता सामान्य दागिने खरेदीतील उच्च मूल्य प्राप्त झालेल्या किंमतीत रुपांतरित झाली आहे.

सोन्याच्या किंमतीतील वाढ ही सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून चिंताजनक आहे. यातून सोन्याची चोरी होण्याच्या घटांमध्ये वाढ होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या परिस्थितीत सोने खरेदीपेक्षाही सुरक्षित साठवणूक ही काळाची गरज बनली आहे. सोन्याचे मूल्य ऐतिहासिक स्तरावर पोहोचल्यामुळे घरात किंवा इतर ठिकाणी सुरक्षित ठेवणे हे गुंतणूकीइतकेच आव्हानात्मक बनले आहे.

Gold Rate
Gold Rate Today: सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; ऐन लग्नसराईत ग्राहक हैराण, मुंबईसह तुमच्या शहरातील भाव काय?

१) सोन्याच्या साठवणुकीकडे दुर्लक्ष करणे

अनेक कुटुंबांमध्ये सोन्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य दिले जात नाही. सोन्याची खरेदी केल्यानंतर सुरक्षिततेबाबत विचार सुरु होतो. सोन्याचे दागिने कपाटात, ड्रॉवरमध्ये, घरात उपलब्ध असलेल्या जागेत ठेवले जातात. ही पूर्वापार सुरु असलेली पद्धत आता जोखमीची ठरु शकते.आजच्या काळात सोन्याची साठवणूक ही नियोजनबद्ध, सुरक्षित आणि जबाबदार असणे गरजेचे आहे. केवळ दागिने मावतील अशा जागा शोधण्यापेक्षा, मौल्यवान वस्तूंच्या सुरक्षेसाठी तयार केलेल्या होम लॉकरसारखा पर्याय वापरणे उचित ठरेल.

Gold Rate
Gold Rate Today: गुढी पाडव्यानंतर सोन्याचे भाव बदलले, स्वस्त झालं की महागलं? वाचा २४k, २२k गोल्डचे ताजे दर

२) साठवणुकीच्या जुन्या, पारंपरिक आणि कालबाह्य पद्धतींवर अवलंबून राहणे

वर्षानुवर्षे अनेक भारतीय घरांमध्ये मौल्यवान वस्तू या तांदूळ, गहू किंवा पिठाच्या डब्यात, माठामध्ये, गादीखाली किंवा कपाटांच्या कोप-यात लपवून ठेवण्याची पद्धत आहे. सुरक्षिततेची साधनांची कमतरता आणि साधी राहणीमान असतानाच्या काळात या पद्धती कदाचित सोयीच्या वाटत असतील. आजच्या आधुनिक युगात या पूर्णपणे कालबाह्य झाल्या आहेत. ग मौल्यवान वस्तूंसाठी खास तयार केलेले आधुनिक लॉकर विश्वासार्ह वाटतात. ड्युअल किंवा ट्रिपल लॉकिंग सिस्टीम मजबूत बांधणीने सज्ज असलेले हे लॉकर्स घरात पक्के बसवता येतात. कपाटात, पलंगाच्या आत किंवा माळ्यावर या लॉकर्सला घट्ट बसवता येते. हे लॉकर्स वजनाने हलके असल्याने कोणालाही सहज हलवता येतील. लॉकर्सच्या वैशिष्ट्यपूर्ण रचनेमुळे तुमची संपत्ती सुरक्षित राहते.

Gold Rate
Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल, वाचा २२k, २४k सोन्याचे प्रति तोळा दर

३) एकाच ठिकाणी साठवणूक करणे

अनेकदा घरातील सर्व दागिने एकाच ठिकाणी ठेवले जातात. नेहमीच्या वापरातील दागिने वापरताना ही सवय बाळगली जाते. दागिने हाताळणे सोपे वाटत असले तरीही सुरक्षिततेच्या दृष्टीने ही सवय घातक ठरते. सोने ठेवण्याची जागा सुरक्षित नसेल तर एकाच फटक्यात सगळे दागिने लंपास होण्याची भीती नाकारली जाता येत नाही. घरामध्ये संपत्ती आणि दागिने वाढत असल्यास या मौल्यवान वस्तूंच्या साठवणुकीत शिस्त आणि सुसूत्रता आणणे गरजेचे आहे. आजकाल घरातील मौल्यवान वस्तू सुरक्षित कप्प्यांमध्ये किंवा एकापेक्षा जास्त होम लॉकर्समध्ये विभागून ठेवल्या जातात. हा सुरक्षित उपाय मानला जातो.

४) प्रवास, घरातील लोकांच्या सततच्या रेलचेलीत जोखमींकडे दुर्लक्ष करणे

आजच्या काळात अनेकांनी धावत्या जीवनशैलीचा स्विकार केला आहे. सततचा प्रवास, घरगुती कार्यक्रम, विभक्त कुटुंब पद्धती यात घरांतील अनेक माणसे व्यस्त असतात. वाढत्या ऑनलाईन खरेदीच्या वितरण सेवेमळे अनेकांची घरात रेलचेल सुरु असते. व्यस्त जीवनशैलीमुळे घर बंद असेल किंवा बाहेरच्या लोकांच्या वावरावर लक्ष ठेवता येत नसल्यास दागिन्यांच्या सुरक्षिततेमध्ये गंभीर त्रुटी निर्माण होऊ शकतात. अशा वेळी केवळ जुन्या कपाटांवर किंवा कपाटांच्या लॉकरवर अवलंबून राहणे पुरेसे नाही.

५) भक्कम सुरक्षिततेला महत्त्व न देणे

सोन्याच्या सुरक्षिततेच्या मुद्द्यावर कानाडोळा करणे हा प्रकार आजही जनमानसांत सर्रासपणे दिसून येतो. सोन्याची किंमत वाढत असताना हा प्रकार आजही सुरु आहे. अनेकजण घराचे सौंदर्य वाढवण्यासाठी टीव्ही किंवा ब्लूटूथ स्पीकर्स यांसारख्या आधुनिक उपकरणांवर आवर्जून खर्च करतात. मात्र सोन्याच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक यंत्रणांच्या अंमलबजाणीकडे दुर्लक्ष होते. आजच्या काळात सोन्याचे वाढते मूल्य आणि संरक्षणात्मक उपाय म्हणून सुरु अससेली पूर्वापार पद्धती या दोन्हींमध्ये मोठी तफावत आहे. सोने हे आता केवळ सांस्कृतिक वारसा नसून, उच्च मूल्य प्राप्त झालेली आर्थिक मालमत्ता आहे. सोन्याचे महत्त्व लक्षात घेता साठवणुकीची पद्धतही आधुनिक असायला हवी. आजच्या काळात अत्याधुनिक होम लॉकर्स आणि घरातील एकात्मिक सुरक्षा यंत्रणा चैनीची वस्तूंपुरती मर्यादित राहिलेल्या नाहीत. ही गुंतवणूक रोजच्या जीवनातील व्यावहारिक आणि दीर्घकालीन गुंतवणूक झाली आहे. होम लॉकर्स तुमच्या मौल्यवान संपत्तीला संपूर्णपणे संरक्षण देतात.

Gold Rate
Gold Rate Today: अक्षय्य तृतीयेआधी सोन्याच्या किंमतीत मोठा बदल, वाचा २२k, २४k सोन्याचे प्रति तोळा दर

संरक्षणात्मक उपाययोजना करताना...

भारतीय कुटुंबामध्ये सोने हा बचतीचा मुख्य आधार मानला जातो. अनेकांच्या भावनांचे प्रतीक म्हणून सोन्येचे महत्त्व नेहमीच अढळ राहील. मात्र वाढत्या सोन्याच्या किंमती, धावती जीवनशैली पाहता या मौल्यवान ठेव्याच्या सुरक्षेकडे पाहण्याचा परंपरांगत दृष्टीकोनही बदलायला हवा. केवळ सोने खरेदी करुन चालणार नाही तर बदलत्या काळातील धोके ओळखून आधुनिक आणि सक्षम उपययोजनांचा अवलंब करायला हवा. या सुरक्षित योजना काळाची गरज बनली आहे. सोन्याचा वारसा जपतानाच त्याच्या सुरक्षिततेची खात्री बाळगणे, हेच ख-या अर्थाने आपली आर्थिक आणि भावनिक सुरक्षा सुनिश्चित करणारे पाऊल ठरेल.

Gold Rate
Gold Rate Today : अखेर सोन्याच्या दरात मोठी घसरण, अक्षय्य तृतीयेला करा खरेदी; 24k, 22k, 18k गोल्डचे ताजे दर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com