Akshaya Tritiya 2026 Date: अक्षय तृतीया केव्हा आहे ? काय आहे सोने खरेदी करण्याचा शुभ मुहूर्त?

Akshaya Tritiya 2026 Muhurat : अक्षय तृतीया हा ‘अबुझ मुहूर्त’ मानला जातो, त्यामुळे या दिवशी केलेली खरेदी व गुंतवणूक अखंड वाढते, अशी धारणा आहे. सूर्योदयानंतर सुरू होणाऱ्या तृतीया तिथीत सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते.
Akshaya Tritiya 2026  Muhurat :
Devotees buying gold jewellery on the auspicious occasion of Akshaya Tritiya.saam tv
Published On
Summary
  • अक्षय तृतीया १९ किंवा २० एप्रिलला साजरी होण्याची शक्यता

  • ‘अबुझ मुहूर्त’ असल्यामुळे सर्व शुभ कार्यांसाठी योग्य दिवस

  • सोने खरेदीसाठी विशेष महत्त्वाचा सण

Summary

अक्षय तृतीयेला 'अखाती तीज' असेही म्हणतात, हा सनातन धर्मातील सर्वात पवित्र दिवसांपैकी एक आहे. भगवान विष्णूचा सहावा अवतार भगवान परशुराम यांचा जन्मदिवसही याच दिवशी साजरा केला जातो. दरम्यान या दिवसाला 'अबुझ मुहूर्त' मानले जाते. एक असा दिवस जो इतका शुभ आहे की विवाह, गृहप्रवेश, नवीन व्यवसाय सुरू करणे, मालमत्ता खरेदी किंवा इतर शुभ कार्यांसाठी वेगळ्या मुहूर्त पाहण्याची गरज नसते.

Akshaya Tritiya 2026  Muhurat :
Akshaya Tritya: तीन राशींसाठी अक्षय तृतीया असेल खास; करिअरमधील प्रगतीसह संपत्तीत होईल वाढ

यासाठी पंचांग पाहण्याची गरज नसते. हा संपूर्ण दिवस स्वतःच अत्यंत पवित्र असतो. मात्र अक्षय तृतीया १९ एप्रिलला आहे की २० एप्रिलला याबद्दल अनेकांना संभ्रम आहे. हा संभ्रम सर्वत्र पसरलेला असून त्यामागे एक विशिष्ट खगोलशास्त्रीय कारण आहे.

Akshaya Tritiya 2026  Muhurat :
Akshaya tritiya 2026: अक्षय तृतीया 2026 ला गृहप्रवेश करणार? जाणून घ्या पूजा, मुहूर्त आणि पारंपरिक नियम

अक्षय तृतीया केव्हा आहे?

अक्षय तृतीयेचा१९ एप्रिल रोजी सकाळी १०:४५ वाजेपासून सुरू होते आणि २० एप्रिल रोजी सकाळी ७:४९ पर्यंत असेन. हा सण दोन्ही दिवस असणार आहे. यामुळे नागरिकांचा तारखेबाबत गोंधळ उडाल आहे. धर्मग्रंथांच्या परंपरेनुसार सणाची तारीख ठरवताना सूर्योदयाच्या वेळी असलेल्या तारखेला—ज्याला 'उदय तिथी' म्हणतात, त्याला प्राधान्य दिले जाते.

या तर्कानुसार अक्षय तृतीया साजरी करण्यासाठी १९ एप्रिल हा योग्य दिवस असेल. तसेच २० एप्रिल रोजी वैशाख शुक्ल तृतीया तिथी पहाटेच संपते. त्यामुळे दिवसाचा उर्वरित भाग कोणत्याही शुभ मुहूर्ताशिवाय किंवा योगाविना राहतो. अक्षय तृतीया साजरी करण्यासाठी १९ एप्रिल हा अधिक योग्य दिवस आहे, कारण या दिवशी शुभ कार्ये करण्यासाठी अधिक लांब आणि परिपूर्ण वेळ मिळतो.

खरेदीसाठी शुभ दिवस

जे लोक गुंतवणूक करण्याचा किंवा काही मालमत्ता आणि वाहन खरेदी करण्याचा विचार करत आहेत, त्यांच्यासाठी हा दिवस अधिक महत्त्वाचा आहे. अक्षय तृतीयेला सोने-चांदी खरेदी करणे, जमीन किंवा मालमत्ता घेणे. यादिवशी नवीन व्यवसाय सुरू करणे अत्यंत शुभ मानले जाते. या दिवशी केलेली गुंतवणूक स्थिर प्रगती आणि दीर्घकालीन स्थिरता आणणारी. आयुष्यात समृद्धी येते. वैभव प्राप्त होते, असे मानले जाते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com