Gold Rate Today: आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक हरपली; बाजारभावात मोठी पडझड, जाणून घ्या 24k, 22k, 18k सोन्याचे दर

Gold Rate Today: सोमवारच्या वाढीनंतर मंगळवारी सोन्याच्या दरात घसरण दिसून आली. २४ कॅरेट, २२ कॅरेट आणि १८ कॅरेट सोन्याचे नवीनतम दर जाणून घ्या.
Gold Rate Today:
GOLD RATE TODAY: 24K, 22K AND 18K GOLD PRICES FALL ON TUESDAY
Published On
Summary
  • मंगळवारी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली.

  • सोमवारी प्रति तोळा ३२० रुपयांची वाढ झाली होती.

  • प्रॉफिट बुकिंगमुळे बाजारात घसरण दिसली.

आठवड्याच्या दुसऱ्या दिवशी सोन्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. सोमवारी सराफा बाजार सुरू होताच सोने प्रति तोळाच्या दरात ३२० रूपयांची वाढ झालेली पाहायला मिळाली होती. मात्र मंगळवारी सराफा बाजारात सोन्याच्या दर खाली आल्याचं दिसत आहे. अमेरिका आणि इराण यांच्यातील संभाव्य कराराबाबतच्या अनिश्चिततेमुळे तेलाच्या किमती वाढलेल्या होत्या, ज्यामुळे महागाईची भीती आणि व्याजदरवाढीची शक्यता निर्माण झाली होती. नफा वसुलीमुळे (प्रॉफिट बुकिंग) ही घसरण झाली. देशांतर्गत सराफा बाजारातही सोन्याच्या दरात घसरण झाली.

Gold Rate Today:
LPG Price Today : सीएनजीसारखेच रात्रीत एलपीजी गॅसचे दर बदलले? घरगुती सिलिंडर बुक करण्याआधी दर वाचाच

दरम्यान महाराष्ट्रात साजरा केला जाणारा अधिक मास म्हणजेच धोंड्याच्या महिन्याला रविवारपासून सुरुवात झाली. यामुळे सोने-चांदीच्या बाजारात खरेदी जोर वाढलाय. आज सराफा बाजारात सोन्याचे दर घसरल्याने रिटेल बाजारात खरेदी वाढेल असा अंदाज आहे.

भारतातील सोन्याचा आजचा भाव

भारतात २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,८८९ असून, तो सोमवारी असलेल्या दरापेक्षा ₹४९ ने कमी आहे. २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१४,५६५ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४५ ने कमी आहे. १८-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹११,९१७ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹३७ ने कमी आहे.

Gold Rate Today:
Petrol Price Hike: महागाईचा स्फोट! पेट्रोल 10 दिवसांत 7.50 रुपयांनी महागले, तुटवडा असतानाच दरवाढीचा भडका

२४-कॅरेट सोन्याचा भाव

आज मंगळवारी २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१५,८८९ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४९ ने कमी आहे. दरम्यान, २४-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,५८,८९० असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४९० ने कमी आहे.

२२-कॅरेट सोन्याचा दर

२२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति ग्रॅम ₹१४,५६५ असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४५ ने कमी आहे. दरम्यान, २२-कॅरेट सोन्याचा भाव प्रति १० ग्रॅम ₹१,४५,६५० असून, तो कालच्या भावापेक्षा ₹४५० ने कमी आहे.

MCX सोन्याचे दर

MCX सोन्याचे जून फ्युचर्स ०.२४टक्क्यांनी घसरून ₹१,५८,६९९ प्रति १० ग्रॅम झाले, तर MCX चांदीचे जुलै फ्युचर्स १.२टक्क्यांनी घसरून ₹२,७३,३४९ प्रति किलो झालेत. २५ मे रोजी प्रति बॅरल $९६ च्या खाली घसरल्यानंतर मंगळवारी सकाळी ब्रेंट क्रूडच्या किमती १टक्क्यांनी वाढून प्रति बॅरल $९८ च्या जवळपास पोहोचल्या, ज्यामुळे डॉलर निर्देशांक वधारला आणि वाढत्या महागाईबद्दल चिंता वाढली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com