

सोन्याच्या दरात वाढ
२४ तासात सोन्याचे दर २००० रुपयांनी वाढले
आजचे सोन्याचे दर किती?
सोन्याच्या दरात सातत्याने बदल होताना दिसत आहे.सोन्याच्या दरात चढ-उतार सुरु आहे. मध्यंतरी सोन्याचे दर १ लाख ४० हजारांवर गेले होते. त्यानंतर मात्र, सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होताना दिसत आहे. आजदेखील सोने-चांदीच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे.
जळगावातील सराफा बाजारात सोने-चांदीच्या दराने उच्चांक गाठला आगे. गेल्या २४ तासात सोन्याचे दर २ रुपयांनी वाढले आहेत. चांदीच्या दरात ४००० रुपयांची वाढ झाली आहे. हे दर दीड लाखांपेक्षा जास्त झाले आहेत. त्यामुळे लग्नसराईच्या काळात सोने खरेदी करावे की नाही असा प्रश्न खरेदीदारांना पडला आहे.
आजचे सोन्याचे दर (Gold Rate Today Hike)
आजचे सोन्याचे दर जीएसटीसह १ लाख ५७ हजार ५९० रुपयांवर पोहचले आहेत. तर चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलोमागे २ लाख ६३ हजार ६८० रुपयांवर पोहचले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत वाढ होत आहे.
१९ एप्रिलला अक्षय्य तृतीया आहे. अक्षय्य तृतीयाला सोने खरेदी करणे शुभ मानले जाते. त्यामुळे अनेकजण सोन्याचे एखादी वस्तू घेतात. मात्र, सततच्या भाववाढीमुळे यंदा सोने खरेदीकडे पाठ फिरवतील, असं दिसत आहे.
सोन्याचे दर का वाढले? (Why Gold Price Increase)
जागतिक पातळीवर सुरु असलेल्या घडामोडींचा सोने-चांदीच्या किंमतीवर परिणाम होत आहे. अमेरिका इराणच्या संभाव्य चर्चांमुळे डॉलरची किंमत घसरली आहे. सोने जागतिक बाजारात स्वस्त होत आहे, त्यामुळे मागणी वाढून दरात वाढ होते. याचसोबत सणासुदीमुळे मागणी वाढत असल्याचे सोन्याचे दरदेखील वाढले आहे.