Gold Price Today : खुशखबर! सोनं ₹1,000 ने तर चांदीत ₹16000 स्वस्त, वाचा सुवर्णनगरीतले आजचे ताजे दर

Gold Price Falls : जळगावमध्ये सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण झालेली आहे. ७ दिवसांत सोनं ५ हजारांनी, चांदी तब्बल १६ हजारांनी स्वस्त होऊन खरेदीदारांना दिलासा मिळाला आहे.
gold price falls in India latest update
gold price falls in India latest updategoogle
Published On

सोनं-चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. आज जळगावच्या सुवर्णनगरीत सोनं-चांदीच्या दरात मोठी घसरण झाली आहे. आज 10 ग्रॅम सोन्याचा दर 1 लाख 41 हजार रुपये, तर किलो चांदीचा दर 2 लाख 22 हजार रुपये इतका नोंदवला गेला. विशेष म्हणजे, एका दिवसात सोन्याच्या दरात 1 हजार रुपयांची, घसरण झाली आहे. गेल्या सात दिवसांचा विचार केला तर सोनं 5 हजार रुपयांनी स्वस्त, तर चांदी तब्बल 16 हजार रुपयांनी घसरली आहे.

gold price falls in India latest update
8th Pay Commission Recruitment : 8 व्या वेतन आयोगात नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी, 1.80 लाखांपर्यंत मानधन, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

सराफा व्यावसायिकांच्या मते, अमेरिका-इराणमधील युद्धजन्य परिस्थिती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेचा परिणाम मौल्यवान धातूंच्या दरावर होत आहे. त्यामुळे सध्या दरात चढ-उतार सुरू आहेत.सराफा तज्ज्ञांचा अंदाज आहे की, जोपर्यंत युद्धजन्य परिस्थिती कायम राहील तोपर्यंत सोन्याच्या दरावर दबाव राहू शकतो. मात्र परिस्थिती निवळल्यानंतर सोन्याच्या किमती पुन्हा वाढण्याची शक्यता आहे.

दरम्यान, दीर्घकालीन दृष्टीने सोने आणि चांदीमध्ये गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना चांगला परतावा मिळू शकतो, असे मतही सराफा तज्ज्ञांनी व्यक्त केले आहे.

Goodreturn नुसार, आज 24 कॅरेट 10 तोळं सोन्याच्या किंमतीत 1,100 रुपयांची घसरण झाली आहे. २४ कॅरेट सोन्याच्या एक तोळ्याचा भाव 1 लाख 42 हजार 800 रुपयांवर पोहोचला आहे. चांदीच्या दरात मात्र आज कोणताही बदल झालेला नाही. 100 ग्रॅम चांदीचा दर कालप्रमाणेच 23 हजार 500 रुपये इतकाय कायम आहे. तुम्ही सोनं- चांदी खरेदी करत असाल किंवा त्यामध्ये गुंतवणूक करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते.

gold price falls in India latest update
Vegetable Price Hike Maharashtra : सर्वसामान्यांना मोठा धक्का! राज्यभरात भाजीपाल्याचे दर गगनाला, कोणती भाजी किती महागली?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com