सोशल मिडिया वापरताना नेहमी काळजी घ्यायला हवी. अनेकदा सोशल मीडियाद्वारे फसवणूक होते. सध्या सोशल मीडियावरुन लिंक्स पाठवून आर्थिक फसवणूक होण्याच्या घटना दिवसेंदिवस वाढत आहे. अशातच सध्या सोशल मीडियावर एक मेसेज व्हायरल होत आहे. ज्यात केंद्र सरकार बेरोजगार तरुणांना भत्ता देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. हा मेसेज सध्या खूपच व्हायरल होत आहे. मात्र, ही माहिती खोटी आहे. या मेसेजमध्ये कोणतेही तथ्य नसल्याचे सांगितले जात आहे. (Fact Check)
केंद्र सरकारने बेरोजगार तरुणांसाठी नवीन योजना (Scheme For Unemployed People) सुरु केली आहे. त्यात बेरोजगार लोकांना पैसे दिले जातात, असे सांगितले जात आहे. मात्र, अशी कोणतीही योजना राबवण्यात आलेली नाही. याबाबत PIB ने फॅक्ट चेक केले आहे.
PIBच्या पोस्टनुसार,व्हायरल मेसेजमध्ये सांगितले जात आहे की, प्रधानमंत्री बेरोजगार योजना सुरु करण्यात आली आहे. त्यात बेरोजगार तरुणांना दर महिन्याला ३५०० रुपये सरकारकडून दिले जाणार आहे. याचसोबत एक लिंक दिली जात आहे त्यावर जाऊन रजिस्ट्रेशन करायला सांगितले जात आहे.
प्रधानमंत्री बेरोजगार भत्ता योजना २०२२ अंतर्गत रजिस्ट्रेशन सुरु झाले आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरुन रजिस्ट्रेशन करा, असं सांगितलं जात आहे. PIB ने या मेसेजचं फॅक्ट चेक केले आहे. त्यानुसार, भारत सरकारकडून अशी कोणतीही योजना सुरु केली नसल्याचे सांगितले जात आहे. त्याचसोबत कोणत्याही लिंकवर क्लिक करु नका, असे सांगितले जात आहे. (Fact Check About Viral Message)
सोशल मीडियावर काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर फ्री मोबाईल योजना सुरु करण्यात आल्याचा मेसेज व्हायरल होत होता. त्यात सरकार नागरिकांना मोफत मोबाईल देत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, या मेसेजमध्येही काहीही तथ्य नव्हतं. त्यामुळे सोशल मीडियावर येणाऱ्या कोणत्याही लिंकवर क्लिक करु नये. आपली वैयक्तिक माहिती कोणालाही देऊ नये. कोणत्याही लिंकवर जाऊन रजिस्टर करु नये. यामुळे तुमचे आर्थिक नुकसान होऊ शकते.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.