Mahua Moitra: महुआ यांना हायकोर्टाचा धक्का, ईडीविरोधातील याचिका फेटाळली; वैयक्तिक माहिती लीक केल्याचा होता आरोप

Delhi HC News: टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या याचिकेत महुआ यांनी ईडीला त्यांची वैयक्तिक माहिती मीडियात लीक करण्यापासून थांबवण्यात यावं, अशी विनंती केली होती.
Delhi HC dismisses Tmc former member of parliament Mahua Moitra plea against media leaks by ED
Delhi HC dismisses Tmc former member of parliament Mahua Moitra plea against media leaks by ED Saam Tv

Mahua Moitra:

टीएमसी नेत्या महुआ मोईत्रा यांची याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली. या याचिकेत महुआ यांनी ईडीला त्यांची वैयक्तिक माहिती मीडियात लीक करण्यापासून थांबवण्यात यावं, अशी विनंती केली होती.

महुआ मोईत्रा यांच्याविरुद्ध फेमा प्रकरणात ईडी चौकशी करत आहे. न्यायमूर्ती सुब्रमण्यम प्रसाद यांच्या खंडपीठाने ही याचिका फेटाळून लावली. महुआ यांनी आपल्या याचिकेत म्हटले होते की, त्यांच्याविरुद्ध पारदर्शक पद्धतीने तपास करण्याऐवजी ईडी त्यांच्याशी संबंधित माहिती लीक करत आहे.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Delhi HC dismisses Tmc former member of parliament Mahua Moitra plea against media leaks by ED
Lok Sabha Election 2024 Schedule: लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक 'या' दिवशी होऊ शकतं जाहीर, जाणून घ्या किती टप्प्यात होऊ शकतं मतदान

महुआ यांनी आपल्या याचिकेत म्हटलं आहे की, याचिकाकर्त्याचे संवेदनशील तपशील लीक करून मीडिया ट्रायल घेण्याचा ईडीचा हेतू आहे, असे दिसते. लीक झालेल्या प्रकरणांमध्ये तपासानंतर समोर आलेल्या काही आरोपांचाही समावेश आहे. या लीकमुळे प्रकरणाच्या तपासात पक्षपातीपणा तर होत आहेच, शिवाय याचिकाकर्त्याच्या प्रतिष्ठेला जनतेच्या नजरेत मलिन करण्याचा प्रयत्न केला जात आहे.  (Latest Marathi News)

प्रलंबित तपासासंदर्भात त्यांनी 19 मीडिया हाऊसेसना कोणतीही पुष्टी न केलेली, खोटी, बदनामीकारक सामग्री प्रकाशित आणि प्रसारित करण्यापासून रोखण्याची मागणी केली आहे. माहिती लीक झाल्यामुळे तपास प्रक्रियेवर याचा परिणाम झाला आहे. यामुळे मोईत्रा यांच्या गोपनीयता, सन्मान आणि निष्पक्ष तपासाच्या अधिकाराचेही उल्लंघन झाले आहे, असं याचिकेत सांगण्यात आलं आहे.

Delhi HC dismisses Tmc former member of parliament Mahua Moitra plea against media leaks by ED
Voter ID Card: मतदान ओळखपत्र हरवलंय? काळजी करू नका! असं बनावट येईल डुप्लिकेट मतदार ओळखपत्र

महुआ मोईत्रा यांनी न्यायालयात सांगितले की, तपास यंत्रणा या प्रकरणाशी संबंधित गोपनीय माहिती मीडियाला देत आहे. ईडीकडून माझा छळ होत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांनी (ईडीने) माझ्याकडून बरेच साहित्य मागितले आहे. तेही प्रेसमध्ये जाईल का? असं त्या म्हणाल्या.

यातच केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वतीने अतिरिक्त सॉलिसिटर जनरल चेतन शर्मा यांनी न्यायालयात युक्तिवाद करताना म्हटलं आहे की, ही माहिती कोणत्या स्त्रोतांद्वारे लीक झाली, याबाबत मंत्रालयाकडे कोणतेही उत्तर नाही. ईडीने आपले विशेष वकील झोहैब हुसैन आणि वकील विवेक गुरनानी यांच्यामार्फत हजर राहून सांगितले की, तपास संस्थेने या प्रकरणाबाबत कोणतीही प्रेस रिलीझ जारी केलेली नाही किंवा कोणतीही माहिती लीक केलेली नाही.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com