Voter ID Card: मतदान ओळखपत्र हरवलंय? काळजी करू नका! असं बनावट येईल डुप्लिकेट मतदार ओळखपत्र

How to Apply for Election Card: डुप्लिकेट मतदार ओळखपत्र बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही.
How To Apply Online for Voter ID Card
How To Apply Online for Voter ID CardSaam Tv
Published On

How to Apply for Election Card:

देशात कधीही लोकसभा निवडणूक जाहीर होऊ शकते. निवडणुकीत मतदान करताना मतदार ओळखपत्र आवश्यक आहे. यामुळे तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळतो, तुम्हाला मतदान करता येतं. मात्र जर तुमचे कार्ड खराब झाले किंवा हरवले तर तुम्ही डुप्लिकेट कार्डसाठी अर्ज करू शकता.

डुप्लिकेट मतदार ओळखपत्र बनवण्याची पद्धत अतिशय सोपी आहे. यासाठी तुम्हाला कोणत्याही सरकारी कार्यालयात जावे लागणार नाही. आज आम्ही तुम्हाला मतदार ओळखपत्र पुन्हा बनवण्याशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊ... ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

How To Apply Online for Voter ID Card
Lok Sabha Election 2024 Schedule: लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक 'या' दिवशी होऊ शकतं जाहीर, जाणून घ्या किती टप्प्यात होऊ शकतं मतदान

पहिला प्रश्न, कोणत्या परिस्थितीत मतदार ओळखपत्र पुन्हा बनवता येईल?

तुमचे मतदार ओळखपत्र हरवले किंवा चोरीला गेल्यास, तुम्ही मतदार ओळखपत्र पुन्हा बनवण्यासाठी अर्ज करू शकता.  (Latest Marathi News)

मतदार ओळखपत्र जुने झाले, फाटले किंवा फोटो/नाव मिटले तर ते पुन्हा बनवता येईल का? (Can the voter ID card be regenerated if it becomes old, torn or photo/name erased?)

होय, मतदार ओळखपत्र जुने, फाटलेले किंवा वापरण्यायोग्य नसल्यास तुम्ही पुन्हा मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी अर्ज करू शकता.

डुप्लिकेट मतदार ओळखपत्र बनवण्यास जास्त वेळ लागतो का?

नाही, डुप्लिकेट मतदार कार्ड बनवण्यासाठी नवीन मतदार ओळखपत्र बनवण्यापेक्षा कमी वेळ लागतो.

डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी घरी बसून अर्ज करता येईल का? (Can one apply for duplicate voter ID card at home?)

होय, डुप्लिकेट मतदार ओळखपत्र मिळविण्यासाठी तुम्हाला जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत. तुम्ही घरबसल्या नवीन मतदार ओळखपत्रासाठी अर्ज करू शकता. केंद्रीय निवडणूक आयोगाने आता सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

How To Apply Online for Voter ID Card
Nana Patole News: मनोज जरांगे यांनी सरकारशी भांडावं,पण...'; राहुल गांधींवरील वक्तव्यानंतर नाना पटोलेंनी दिला सल्ला

डुप्लिकेट मतदार ओळखपत्रासाठी अर्ज कसा करावा? (How to Apply for Duplicate Voter ID Card?)

  • डुप्लिकेट मतदार ओळखपत्र बनवण्यासाठी सर्वातआधी तुम्हाला तुमच्या संबंधित राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या वेबसाइटवर जावे लागेल. त्यानंतर फॉर्म EPIC-002 ची प्रत डाउनलोड करावी लागेल.

  • हा फॉर्म फोटो मतदार ओळखपत्र देण्यासाठी वापरला जातो.

  • हा फॉर्म भरताना सर्व माहिती काळजीपूर्वक भरा.

  • फॉर्मसोबत सर्व आवश्यक कागदपत्रे जोडा.

  • फॉर्ममध्ये तुम्हाला डुप्लिकेट ओळखपत्र बनवण्याचे कारणही द्यावे लागेल.

  • तुमचे मतदार ओळखपत्र हरवले किंवा चोरीला गेल्यास, तुम्ही एफआयआरची प्रतही जोडावी लागेल.

  • याशिवाय, कागदपत्रांमध्ये पासपोर्ट आकाराचा फोटो, पत्ता आणि ओळखीचा पुरावा देखील असावा.

  • यानंतर हा फॉर्म तुमच्या स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे सबमिट करा.

  • तुम्हाला एक संदर्भ क्रमांक दिला जाईल.

  • या क्रमांकाच्या मदतीने तुम्ही राज्य निवडणूक कार्यालयाच्या वेबसाइटला भेट देऊन तुमच्या अर्जाची स्थिती जाणून घेऊ शकता. म्हणजेच तुमचे मतदार ओळखपत्र बनले आहे की, नाही हे तुम्ही शोधू शकता.

  • एकदा तुम्ही तुमचा फॉर्म सबमिट केल्यानंतर, त्याची आधी पडताळणी केली जाते. त्यानंतर डुप्लिकेट कार्ड प्रक्रिया सुरू होते.

  • पडताळणीनंतर तुम्हाला कळवले जाईल. यानंतर तुम्ही स्थानिक निवडणूक अधिकाऱ्याकडे जाऊन ते मिळवू शकता.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com