
सोशल मीडियाचा वापर
सर्वाधिक वापरले जाणारे सोशल मीडिया अॅप
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मची कमाई
लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वजण सोशल मीडियाचा वापर करतात. सोशल मीडियावरुन अनेकजण कमाईदेखील करतात. सोशल मीडियाद्वारे इन्फ्युएन्सर, सेलिब्रिटी, क्रिकेटर्स कोट्यवधी रुपये कमावतात. दरम्यान, आता नेपाळमध्ये सोशल मिडिया बंदी करण्यात आली होती. त्यामुळे तरुणांनी आंदोलन केले. या आंदोलनाने खूप हिंसक रुप धारण केले होते. दरम्यान, सोशल मीडियाचे कोट्यवधी युजर्स आहेत.
फेसबुक, इन्स्टाग्राम आणि ट्विटर म्हणजे एक्स प्लॅटफॉर्मवर लाखो युजर्स आहेत. परंतु या तिन्ही प्लॅटफॉर्मवरुन सर्वात जास्त कमाई कुठून होते हे तुम्हाला माहितीये का?
फेसबुक (Facebook)
सोशल मीडियावरील सर्वात प्रभावी अॅप म्हणजे फेसबुक. २०२३ च्या मिडिया रिपोर्टनुसार, फेसबुकवर ३ अरब युजर्स आहेत. त्यामुळे फेसबुकवरुन सर्वाधिक कमाई होते. फेसबुकवर अनेक ब्रँड आपल्या जाहिराती चालवतात. हा कंपनीचे ९७ टक्के हिस्सा आहे. २०२३ मध्ये फेसबुकने जवळपास ११७ बिलियन डॉलरची कमाई केली होती. ज्यातील सर्वाधिक कमाई जाहिरातींमधून झाली होती.
इन्स्टाग्राम (Instagram Earnings)
फेसबुकनंतर इन्स्टाग्रामवरुन सर्वाधिक कमाई होते. इन्स्टाग्राम हीदेखील मेटाची कंपनी आहे. इन्स्टाग्रामवर इन्फ्युएन्सर मार्केटिंग, रिल्सद्वारे कमाई केली जाते. ब्रँड क्रिएटर्संना स्पॉन्सर करतात. यामुळे जाहिरातींची किंमत वाढली जाते. रिपोर्टनुसार, २०३० मध्ये इन्स्टाग्रामने जाहिरातींद्वारे ५० बिलियन डॉलरची कमाई केी होती.
एक्स प्लॅटफॉर्मवरुन किती कमाई? (Twitter Net Worth)
एक्स हादेखील खूप लोकप्रिय सोशल मिडिया प्लॅटफॉर्म आहे. परंतु फेसबुक आणि इन्स्टाग्रामच्या तुलनेत एक्स या प्लॅटफॉर्मची कमाई खूप कमी आहे. २०२३ मध्ये ट्विटरची कमाई ३ बिलियन डॉलर होती. ही कमाई जाहिरातींमधून होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.