EPFO Update: बंद PF खात्याबाबत मोठी अपडेट! EPFO सुरु करणार नवी सुविधा, जाणून घ्या प्रक्रिया...

EPFO E-PRAAPTI Portal Update: EPFO लवकरच ई-प्राप्ती पोर्टल सुरु करणार आहे. त्यामध्ये बंद किंवा निष्क्रिय PF खातं आधारच्या मदतीने पुन्हा सुरु केलं जाणार आहे. पुढे त्यामध्ये अपडेट केली जाईल.
EPFO E-PRAAPTI Portal Update
EPFO updategoogle
Published On

प्रत्येक कर्मचारी हा त्याच्या पगारातला काही भाग शिल्लक ठेवतो. म्हणजेच पगारातला काही भाग हा PFमध्ये जमा होतो. तुम्ही ही रक्कम गरजेच्या वेळेस काढू शकता. पण जर तुमचं PFचं खातं जूनं असेल किंवा बंद असेल तर ते पुन्हा चालू होत नाही असा आत्तापर्यंत नियम होता. मात्र EPFO ने यात बदल केला आहे. हा बदल कर्मचाऱ्यांसाठी खूप महत्वाचा असणार आहे.

Employees' Provident Fund Organisation (EPFO)च्या कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. यामध्ये EPFO लवकरात लवकर एक वेब पोर्टल 'ई-प्राप्ती' सुरु करणार आहे. त्यामध्ये तुम्हाला तुमचं जुनं PF खातं पुन्हा अॅक्टीव्ह करता येईल. श्रम आणि रोजगार मंत्री मनसुख मांडविया यांनी बुधवारी ही माहिती दिली आहे.

EPFO E-PRAAPTI Portal Update
Rasha Thadani: राणी माझ्या मळ्यामंदी..., रवीना टंडनच्या २१ वर्षीय लेकीचं आरस्पानी सौंदर्य, पाहा लेटेस्ट फोटो

यामध्ये तुमच्या आधार कार्डाच्या माहितीवरुन तुमचं खातं अॅक्टीव्ह केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. याच माहितीच्या मदतीने कर्मचाऱ्यांचे जुने खातेही ओळखता येईल. जे युनिवर्सल अकाउंट नंबरशी जोडलेले खातं नसेल तेही यामध्ये ओळखता येईल. कर्मचाऱ्यांच्या जुन्या खात्याला UNA नंबर नंतर जोडला जाईल आणि प्रोफाइल सुद्धा अपडेट करता येईल.

EPFOने २०१४ पासून प्रत्येक कर्मचाऱ्याला १२ अंकी UNA नंबर द्यायला सुरुवात केली होती. नवीन 'E-PRAAPTI' पोर्टलचे पूर्ण नाव हे ' एम्प्लॉई प्रॉविडेंट फंड आधार-बेस्ट अॅक्सेस पोर्टल फॉर ट्रॅकिंग इनऑपरेटिव अकाउंट्स' (Employee Provident Fund Aadhaar-Based Access Portal for Tracking Inoperative Accounts) हे आहे. सुरुवातीला या पोर्टलमध्ये कर्मचाऱ्याला स्वत: ची महत्वाची माहिती द्यावी लागते. हा एक सुरक्षेचा मार्ग आहे. ज्या कर्मचाऱ्यांकडे त्यांच्या खात्याची काहीच माहिती नसेल त्यांच्यासाठी हे पोर्टल खूप कामी येईल.

EPFO E-PRAAPTI Portal Update
Snake Smell: हे ५ पदार्थ ठेवा दाराजवळ, सापांचा धोका होईल कायमचा दूर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com