

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) ने आर्थिक वर्ष 2025-26 साठी पीएफ खात्यांवरील व्याज जमा करण्याची प्रक्रिया यंदा विक्रमी वेगाने पूर्ण केलीये. 15 जुलैपर्यंत सुमारे 35 कोटी सदस्यांच्या खात्यांमध्ये व्याज जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती EPFO ने दिलीये. जुलै महिन्यातच एवढ्या मोठ्या प्रमाणावर खात्यांमध्ये व्याज जमा होण्याची ही पहिलीच वेळ मानली जातेय.
याआधी पीएफ खात्यात व्याज जमा होण्यासाठी अनेक आठवडे, कधी कधी दोन-तीन महिनेही वाट पाहावी लागायची. काही वेळा ही प्रक्रिया सप्टेंबरपर्यंत चालायची. मात्र यंदा डिजिटल तंत्रज्ञानातील बदलामुळे ही प्रक्रिया खूपच जलद पूर्ण झाली. त्यामुळे देशभरातील कोट्यवधी नोकरदारांना मोठा दिलासा मिळाला आहे.
गेल्या काही वर्षांपासून EPFO आपल्या संपूर्ण सिस्टीमचं आधुनिकीकरण होतंय. पूर्वी देशभरातील 123 कार्यालयांमध्ये स्वतंत्र डेटाबेस होता. त्यामुळे व्याजाची गणना, खात्यांची पडताळणी आणि माहिती जुळवण्याची प्रक्रिया वेगवेगळ्या स्तरावर होत असल्याने वेळ लागत होता.
आता हे सर्व डेटाबेस एका केंद्रीय डिजिटल सिस्टीमशी जोडण्यात आले आहेत. यासाठी कोट्यवधी व्यवहार आणि सदस्यांच्या रेकॉर्ड नवीन सिस्टीममध्ये ट्रान्सफर करण्यात आलेत. त्यानंतर प्रत्येक खात्याची माहिती पुन्हा तपासून पडताळणी करण्यात आली, जेणेकरून कोणत्याही सदस्याच्या शिल्लक रकमेवर किंवा व्याजावर परिणाम होणार नाही.
व्याज जमा करण्यापूर्वी EPFO ने प्रत्येक खात्याची पडताळणी केली. सदस्यांची माहिती, खात्याचा तपशील आणि उपलब्ध शिल्लक रक्कम यांची जुळवाजुळव करण्यात आली. सर्व माहिती अचूक असल्याची खात्री झाल्यानंतरच संबंधित खात्यांमध्ये व्याजाची रक्कम जमा करण्यात आली.
याचबरोबर EPFO ने नुकतंच नवीन डिजिटल पोर्टलही सुरू केलंय. या पोर्टलमुळे अनेक सेवा आता अधिक वेगाने उपलब्ध होतायत. पीएफ क्लेमची तपासणी, पैसे काढण्याची प्रक्रिया, खात्याची माहिती पाहणं आणि इतर सेवा पूर्वीपेक्षा अधिक जलद होतायत. आहेत. तसंच चुकीमुळे क्लेम नाकारले जाण्याचे प्रकारही कमी होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
नवीन सुविधांमुळे आता कोणताही कर्मचारी स्वतःच्या पीएफ खात्याची माहिती सहज पाहू शकतो. त्याच्या खात्यात व्याज जमा झाले आहे की नाही, हेही काही मिनिटांत तपासता येते. यासाठी खालील पर्याय उपलब्ध आहेत.
UMANG अॅप
EPFO Member e-Sewa पोर्टल
मिस्ड कॉल सेवा
SMS सेवा
EPFO Member Passbook Portal वरील Passbook Lite
Passbook Lite च्या मदतीने खात्यातील व्यवहार आणि व्याजाची नोंद सहज पाहता येते.
तुमचा UAN एक्टिव्ह असेल तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 7738299899 या क्रमांकावर EPFOHO UAN असा SMS पाठवा.
जर माहिती मराठी, हिंदी किंवा इतर प्रादेशिक भाषेत हवी असेल, तर UAN नंतर त्या भाषेचा कोड लिहावा लागेल. उदाहरणार्थ हिंदीसाठी HIN लिहावे लागते.
यानंतर EPFO कडून तुम्हाला शेवटची PF जमा रक्कम, खात्यातील शिल्लक आणि KYC संदर्भातील माहिती SMS द्वारे पाठवली जाते.
UMANG अॅपद्वारेही पीएफ खात्याचा तपशील सहज पाहता येतो.
त्यासाठी प्रथम अॅपमध्ये लॉगिन करून तुमचा UAN लिंक करा. त्यानंतर EPFO Services मध्ये जाऊन Passbook Lite हा पर्याय निवडा.
आधारशी जोडलेल्या मोबाईल क्रमांकावर आलेला OTP टाकल्यानंतर तुम्ही तुमच्या खात्यातील PF, पैसे काढण्याची माहिती आणि सध्याचा बॅलन्स पाहू शकता.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.