EPFO Update : UPI आणि ATM मधून तुम्ही PF चे किती पैसे काढू शकता? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

EPFO Withdrawal Update : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) लवकरच PF पैसे UPI आणि ATM द्वारे काढण्याची सुविधा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मात्र UPI आणि ATM किती पैसे काढता येणार? जाणून घेऊया
EPFO PF WITHDRAWAL VIA UPI AND ATM SOON: BIG RELIEF FOR SALARIED EMPLOYEES
EPFO PF WITHDRAWAL VIA UPI AND ATM SOON: BIG RELIEF FOR SALARIED EMPLOYEESSaam tv
Published On
Summary
  • PF चे पैसे लवकरच UPI आणि ATM मधून काढता येणार आहेत

  • लवकरच ही सुविधा सुरूर करण्यात येणार आहे

  • या सुविधेमुळे PF रक्कम मिळण्याची प्रक्रिया अधिक जलद होणार

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना (EPFO) आपल्या सेवांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत असून, लवकरच कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (PF) काढण्यासाठी यूपीआय आणि एटीएमचा वापर करता येणार आहे. सरकारने याबाबतची प्रक्रिया जवळपास पूर्ण केल्याचे सांगितले असून, या महिन्याच्या अखेरीस ही सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. याचा मोठा फायदा नोकरदारवर्गाला होणार आहे. जाणून घ्या UPI आणि ATM मधून किती पैसे काढता येणार?

केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनीही या सेवेबाबत लवकरच अधिकृत घोषणा केली जाईल, असे संकेत दिले आहेत. या सुविधेमुळे पीएफ सदस्यांना त्यांच्या खात्यातील रक्कम अधिक जलद आणि सुलभ पद्धतीने मिळू शकणार आहे.

EPFO PF WITHDRAWAL VIA UPI AND ATM SOON: BIG RELIEF FOR SALARIED EMPLOYEES
Gold Rate Today : गुड न्यूज! सोन्याच्या दरात मोठी घसरण, सोनं ४००० रुपयांनी स्वस्त, वाचा आजचे 18K- 22K आणि 24K चे दर

सध्या पीएफमधून पैसे काढण्यासाठी ऑनलाइन अर्ज भरावा लागतो आणि ऑनलाईन प्रक्रियेनंतर रक्कम खात्यात जमा होण्यासाठी साधारणपणे १५ ते २० दिवसांचा अवधी लागतो. मात्र, यूपीआय आणि यूपीआय-सक्षम एटीएमद्वारे ही प्रक्रिया सोपी होऊ शकते. एटीएम किंवा यूपीआयद्वारे किती रक्कम काढता येईल याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

EPFO PF WITHDRAWAL VIA UPI AND ATM SOON: BIG RELIEF FOR SALARIED EMPLOYEES
Monsoon Update : मुंबईसाठी पुढील ४८ तास महत्त्वाचे! 'या' तारखेला मान्सून महाराष्ट्र व्यापणार, हवामान विभागाची मोठी अपडेट

नियमांनुसार, सदस्यांना त्यांच्या एकूण पीएफ निधीपैकी ७५ टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची परवानगी मिळू शकते. तसेच, सदस्यांना ओळख पडताळणीसाठी अनेक कागदपत्रांची गरज भासणार नाही. उमंग ॲपद्वारे फेस ऑथेंटिकेशन टेक्नॉलॉजी (FAT) वापरून माहिती अपडेट करता येणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com