EPFOचा मोठा निर्णय! कोणत्याही क्लेमशिवाय खात्यात जमा होणार पीएफचे पैसे; कोणाला होणार फायदा?

EPFO Big Decision: ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. आता इनऑपरेटिव्ह खात्यातील पैसे ऑटो सेटलमेंटद्वारे जमा करण्यात येणार आहेत.
EPFO
EPFO Saam Tv
Published On
Summary

ईपीएफओ कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी

आता कोणत्याही क्लेमशिवाय खात्यात जमा होणार पीएफचे पैसे

इनऑपरेटिव्ह खात्यातील पैसे ऑटो सेटलमेंटद्वारे होणार जमा

EPFO कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. जर तुम्ही नोकरी करत असाल आणि तुमचा दर महिन्याला पीएफ कट होत असेल तर तुमच्या कामाची बातमी आहे. कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेने लाखो कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेतला आहे. आता ज्या इनऑपरेटिव्ह अकाउंटमध्ये क्लेम न केलेले पैसे आहे त्यांच्यासाठी ऑटो सेटलमेंट सुरु करण्याच्या तयारीत आहे.

EPFO
EPFO Calculation: तुमचा पगार ₹५०,००० आहे? रिटायरमेंटनंतर मिळतील ५.५ कोटी, कसं? कॅल्क्युलेशन वाचा

कोणत्याही क्लेमळिवाय थेट खात्यात पैसे (EPFO PF Withdrawal Auto Settlement)

आता कोणत्याही क्लेमशिवाय कर्मचाऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत.आता ऑटो सेटलमेंट सिस्टीममुळे थेट कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये पैसे जमा होणार आहे. एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, जवळपास अर्ध्यापेक्षा जास्त इनऑपरेटिव्ह अकाउंटमधील पैसे कर्मचाऱ्यांना मिळणार आहे.

ईपीएफओ (EPFO) लवकरच कर्मचाऱ्यांसाठी नवीन सिस्टीम सुरु करण्याच्या तयारीत आहे. ज्या खात्यात अनेक दिवसांपासून ट्रान्झॅक्शन झालेले नाही. त्यांच्या अकाउंटमध्ये ऑटो सेटलमेंट होणार आहे. याअंतर्गत ८.१ लाख आधार-वेरिफाइड इनऑपरेटिव्ह अकाउंट कव्हर केले जाणार आहे. या अकाउंटमध्ये ५२०० कोटी रुपये आहेत.या अकाउंटमधील सर्व पैसे संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवले जाणार आहेत.

EPFO
EPFO चा नवा नियम! PF ट्रान्सफर करणे झाले आणखी सोपे; या कर्मचाऱ्यांना होणार सर्वाधिक फायदा

पीएफ अकाउंटमध्ये किती पैसे?

जवळपास ८.१ लाख अकाउंट इनऑपरेटिव्ह आहेत. त्यांच्या खात्यात पैसे आहेत परंतु गेल्या अनेक वर्षांपासून ट्रान्झॅक्शन झाले नाही. यामध्ये १४००० अकाउंटमध्ये प्रत्येकी ५ लाख रुपये आहेत. ३८००० अकाउंटमध्ये १ लाख ते ५ लाख रुपये आहेत. याचसोबत ४१००० ते ५०,००० अकाउंटमध्ये ५० हजार ते १ लाख रुपये आहेत. या कर्मचाऱ्यांना आता ऑटो सेटलमेंटद्वारे पैसे दिले जाणार आहेत.

EPFO
EPFO 3.0: आता एटीएममधून काढता येणार PFचे पैसे; EPFO 3.0 कसं काम करणार? वाचा सविस्तर

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com