घर बांधायचंय, होम लोन फेडायचंय? नवे नियम जाणून घ्या, PF मधून किती रक्कम मिळणार?

New EPF Rules 2026: घर बांधायचंय किंवा होम लोन फेडायचंय? EPF Scheme 2026 अंतर्गत PF मधून पैसे काढण्याचे नवे नियम, पात्रता, निकासीची मर्यादा आणि आवश्यक अटी जाणून घ्या.
EPF withdrawal rules 2026
EPF withdrawal rules 2026saam tv
Published On: 

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी म्हणजेच EPF हा केवळ निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी केलेली बचत नाही. गरज पडल्यास कर्मचारी आपल्या PF खात्यातून काही रक्कम काढू शकतात. आता EPF Scheme 2026 अंतर्गत आंशिक PF काढण्याचे नियम पूर्वीच्या तुलनेत अधिक सोपे करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. विशेषतः घर खरेदी, घर बांधणे, होम लोन फेडणे किंवा घराची दुरुस्ती यांसाठी PF मधून पैसे काढण्याची सुविधा आहे.

EPF withdrawal rules 2026
कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 20 दिवसांत PF पैसे नाही आले तर काय करायचं? EPFO चा नवा नियम

घरासाठी PF काढण्यासाठी 12 महिन्यांची सदस्यता आवश्यक

नव्या नियमांनुसार, घराशी संबंधित PF निकासीसाठी कर्मचाऱ्याची किमान 12 महिन्यांची EPF सदस्यता असणे, होम लोनची परतफेड तसेच सध्याच्या घराची दुरुस्ती किंवा रिनोव्हेशन यासाठी PF मधून रक्कम काढू शकतो.

EPF withdrawal rules 2026
PF काढण्याचे नियम बदलले; कोणत्या कोणत्या कारणांसाठी काढता येणार पैसे?

PF मधून किती रक्कम काढता येणार?

नव्या नियमांमधील महत्वाचा बदल म्हणजे निकासीची मर्यादा Eligible Member Balance शी जोडण्यात आली आहे. घराशी Eligible Member Balance मधील 100 टक्क्यांपर्यंत रक्कम काढण्याची तरतूद आहे. मात्र PF खात्यातील एकूण रकमे पैकी किमान 15 टक्के रक्कम शिल्लक ठेवणे आवश्यक आहे. सोप्या भाषेत सांगायचे झाल्यास, पात्र PF बॅलन्सपैकी प्रभावीपणे 75 टक्क्यांपर्यंत रक्कम काढता येऊ शकते, तर उर्वरित 25 टक्के रक्कम निवृत्तीनंतरच्या आर्थिक सुरक्षेसाठी खात्यात राहील.

EPF withdrawal rules 2026
EPFO Alert: नोकरी सोडली तरी PF वर मिळणार व्याज? EPFO चा हा नियम नक्की जाणून घ्या

कोणत्या कारणांसाठी PF मधून पैसे काढता येतील?

EPF च्या हाउसिंग कॅटेगरीमध्ये विविध कारणांचा समावेश करण्यात आला आहे. त्यानुसार पात्र कर्मचारी खालील कारणांसाठी PF मधून पैसे काढू शकतो.

घर, फ्लॅट किंवा प्लॉट खरेदी करण्यासाठी

नवीन घर बांधण्यासाठी

होम लोन फेडण्यासाठी

विद्यमान घराची दुरुस्ती करण्यासाठी

घराचे रिनोव्हेशन किंवा आवश्यक सुधारणा करण्यासाठी

या हाउसिंग कॅटेगरीअंतर्गत संपूर्ण सदस्यत्व कालावधीत जास्तीत जास्त 5 वेळा निकासीची सुविधा घेता येऊ शकते.

EPF withdrawal rules 2026
PF चे नियम बदलले, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या

आता पगारापेक्षा PF बॅलन्स महत्त्वाचा

पूर्वी विविध कारणांसाठी PF मधून पैसे काढताना वेतनाच्या गुणकांवर आधारित मर्यादा लागू होत होत्या. नव्या पद्धतीमध्ये Eligible Member Balance हा निकासीच्या गणनेचा महत्त्वाचा आधार आहे. उदाहरणार्थ, एखाद्या कर्मचाऱ्याचा पात्र PF बॅलन्स 10 लाख रुपये असेल, तर खात्यात किमान 25 टक्के म्हणजेच 2.50 लाख रुपये शिल्लक ठेवण्याची अट असल्याने सुमारे 7.50 लाख रुपयांपर्यंत रक्कम काढणे शक्य होऊ शकते. मात्र, प्रत्यक्ष मंजूर होणारी रक्कम EPFO च्या रेकॉर्डमधील पात्रता आणि लागू नियमांवर अवलंबून असेल.

UAN आणि KYC अपडेट असणे गरजेचे

PF मधून पैसे काढण्यासाठी UAN, KYC, बँक खाते आणि सदस्याची वैयक्तिक माहिती अचूक व अपडेट असणे आवश्यक आहे. बँक खात्याची चुकीची माहिती, KYC मध्ये तफावत किंवा सदस्याच्या तपशीलांमध्ये काही गडबड असल्यास PF क्लेममध्ये अडथळा येऊ शकतो. नव्या व्यवस्थेचा उद्देश PF निकासीची प्रक्रिया अधिक ऑनलाइन आणि ऑटोमेटेड करण्याचाही आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com