PF चे नियम बदलले, कर्मचाऱ्यांच्या हातात येणारा पगार कमी होणार का? जाणून घ्या

EPFO Wage Ceiling Increase and 12 Percent PF Contribution:नवीन EPFO नियमांनुसार PF योगदानाची वेतन मर्यादा वाढवण्यात आली आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांच्या PF बचतीत वाढ होऊ शकते; मात्र हातात येणाऱ्या पगारावर परिणाम होणार का, जाणून घ्या.
PF RULES CHANGED:
PF RULES CHANGED:saam tv
Published On

केंद्र सरकारने कर्मचारी भविष्य निर्वाह संघटनेच्या अनिवार्य योगदानासाठी वेतन मर्यादेत वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी गुरुवारी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी सुरू झाली. त्यामुळे EPFO अंतर्गत नोंदणीकृत आणि 20 किंवा त्यापेक्षा अधिक कर्मचारी असलेल्या अस्थापनाना कर्मचाऱ्यांच्या मासिक वेतनच्या 12 टक्के रक्कम PF आणि पेन्शनसाठी जमा करावी लागणार आहे. या योगदानाइतकेच योगदान कर्मचाऱ्यांकडूनही केले जाईल.

PF RULES CHANGED:
EPFO Update : EPFO वर मोठा निर्णय! ₹15 हजारांची वेतन मर्यादा आता ₹25 हजार, लाखो कर्मचाऱ्यांना फायदा

कामगार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनुसार महिन्याला 20 HJAAR रुपयांपर्यंत वेतन असलेल्या कर्मचाऱ्यांच्या PF योगदानात सरासरी 600 रुपयांनी वाढ होऊ शकते. सरकारच्या या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या बचतमध्ये देखील वाढ होईल तसेच अधिक व्याज देखील मिळण्यास मदत होईल. अशी माहिती केंद्रीय कामगार मंत्री मनसुख मांडविया यांनी दिली.

PF RULES CHANGED:
EPF Rule Change : EPF नियमात 12 वर्षांनी मोठा बदल! ₹25,000 वेतन मर्यादा; तुमच्या पगारावर काय परिणाम होणार? वाचा A टू Z अपडेट

दरम्यान वाढीव PF आणि पेन्शनच्या जबाबदारीचा भार कमी करण्यासाठी कंपन्या कर्मचाऱ्यांच्या CTC मध्ये फेरबदल करतील अशी चिंता व्यक्त करण्यात आली आहे. मालकांच्या बाजूने असलेले कायदेशीर पीएफ योगदान कर्मचाऱ्यांच्या वेतनातून वजा करण्याची परवानगी नाही. याबाबत सविस्तर मार्गदर्शक तत्त्वे जारी केली जातील, असे त्यांनी सांगितले.

PF RULES CHANGED:
8th Pay Commission: केंद्रीय पेन्शनधारकांसाठी मोठी बातमी! ₹22,450 पेन्शन वाढून ₹57,697 होणार? जाणून घ्या संपूर्ण गणित

EPFOकडे सध्या जवळपास 8 कोटी योगदान देणारे सदस्य असून सुमारे 7.7 लाख आस्थापने सक्रिय आहेत. तसेच कर्मचारी पेन्शन योजनेचा (EPS) लाभ सुमारे 82 लाख पेन्शनधारकांना मिळत आहे. EPFOकडून व्यवस्थापित करण्यात येणारा एकूण निधी जवळपास 30.1 लाख कोटी रुपयांवर पोहोचला आहे. या निर्णयामुळे कर्मचाऱ्यांच्या सामाजिक सुरक्षेत वाढ होण्यास मदत होईल. तसेच अनिवार्य PF योगदानाची मर्यादा वाढवल्याने नियमांचे पालन करणारे नियोक्ते आणि नियम टाळणारे असंघटित घटक यांच्यातील खर्चातील तफावत कमी होईल. त्यामुळे औपचारिक रोजगाराला चालना मिळण्यास मदत होईल, असे इंडियन स्टाफिंग फेडरेशनच्या कार्यकारी संचालक सुचिता दत्ता यांनी म्हटले आहे.

टेक-होम सॅलरी (हातात येणारा पगार) कमी होईल का?

सध्याच्या नियमांनुसार, EPF मध्ये कर्मचारी आणि कंपनीचे योगदान हे बेसिक सलरी आणि महागाई भत्ताच्या 12% नुसार ठरवले जातात. मात्र अनिवार्य योगदानाची गणना करण्यासाठी सरकारची ठरवलेली वेतन मर्यादा लागू होते. EPF मधील योगदानाची मर्यादा आता 25000 झाल्यानंतर 12 % दराने कर्मचाऱ्यांना दर महिन्याला EPF योगदान 1800 वरून वाढून 3000 रुपये होईल. म्हणजेच ज्या कर्मचाऱ्याचे योगदान आधी 15000 च्या मर्यादेनुसार ठरवले जात होते. त्याच्या पगारातून आता दर महिन्याला 1200 पेक्षा जास्त EPF मध्ये जमा होऊ शकतात.यामुळे त्याच्या हातात येणारा पगार (टेक-होम पे) ₹1,200 पर्यंत कमी होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com