मोठी बातमी! पीएफमधून पैसे काढण्याचे नियम बदलले; लग्न, शिक्षण की आजारपण... आता किती वेळा काढता येणार पैसे?

EPF Update: केंद्र सरकारने EPF 2026 अंतर्गत पीएफ पैसे काढण्याच्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल जाहीर केले आहेत. नोकरी सोडल्यानंतर अंतिम सेटलमेंटसाठी प्रतीक्षा कालावधी, पीएफ अडव्हान्स आणि किमान शिल्लक रकमेबाबतचे नवीन नियम जाणून घ्या.
EPFO
PF Interest Rate EPFO Saam TV
Published On

New EPF Withdrawal Rules 2026: पीएफ (PF) खाते असलेल्या कोट्यवधी कर्मचाऱ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. केंद्र सरकारने नुकतीच नवीन ‘EPF 2026’ योजना जाहीर केली आहे. या नव्या योजनेमुळे भविष्य निर्वाह निधीतून (PF) पैसे काढण्याच्या नियमांमध्ये केंद्र सरकारने मोठे बदल केले आहेत. त्याचा थेट परिणाम तुमच्यावर होणार आहे. पाहूयात नवा नियम काय आहे?

गंभीर आजारपण, लग्नकार्य, मुलांचे शिक्षण किंवा हक्काचे घर खरेदी करण्यासाठी कर्मचाऱ्यांना आपल्या हक्काचे पैसे काढता येतात, मात्र आता यासाठी नवे नियम पाळावे लागणार आहेत. या नव्या नियमांमुळे आता कर्मचाऱ्यांना पीएफमधून पैसे काढताना अधिक विचार करावा लागणार आहे, जेणेकरून भविष्यातील आर्थिक सुरक्षा टिकून राहील.

नोकरी सोडल्यास आता १ वर्ष वाट पाहावी लागणार

नव्या नियमांनुसार सर्वात मोठा झटका अशा कर्मचाऱ्यांना बसला आहे जे रिटायरमेंटपूर्वीच नोकरी सोडतात. जुन्या नियमानुसार, जर एखाद्या कर्मचाऱ्याची नोकरी सुटली किंवा त्याने नोकरी सोडली, तर तो केवळ २ महिने बेरोजगार राहिल्यानंतर आपल्या पीएफचे पूर्ण पैसे (Final Settlement) काढू शकत होता. मात्र, आता नव्या नियमांमुळे नोकरी सोडल्यानंतर पूर्ण पैसे काढण्यासाठी कर्मचाऱ्यांना तब्बल १२ महिने म्हणजेच १ वर्ष वाट पाहावी लागणार आहे.

EPFO
EPFO Update : EPFO चा मोठा निर्णय! तुमच्या संमतीशिवाय PF कापला जाणार नाही, १८०० रुपये अनिवार्य राहणार

अडव्हान्स काढता येणार, पण 'हा' नियम बंधनकारक

कर्मचाऱ्यांना त्यांच्या खात्यातून १०० टक्क्यांपर्यंत अडव्हान्स (EPF Advance) काढण्याची मुभा या नव्या रचनेत देण्यात आली आहे. पण,त्यासाठी सरकारने एक अट घातली आहे. आता कर्मचाऱ्यांना आपल्या पीएफ खात्यात एकूण जमा रक्कमेच्या किमान २५ टक्के रक्कम (Minimum Balance) शिल्लक ठेवणे अनिवार्य करण्यात आले आहे. म्हणजेच, खात्यातील संपूर्ण पैसे अडव्हान्स म्हणून काढता येणार नाहीत. खात्यात २५ टक्के रक्कम ठेवावी लागेल.

EPFO
EPFOचा मोठा निर्णय! पैसे काढण्याचे नियम बदलले, PF खात्यात किती पैसे ठेवावे लागतील?

कोणत्या कारणांसाठी कितीवेळा पैसे काढता येणार?

आजारपणाच्या उपचारासाठी पैसे काढण्याची कोणतीही मर्यादा नाही. स्वतःच्या किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याच्या उपचारासाठी तुम्ही आवश्यकतेनुसार कितीही वेळा पीएफमधून अडव्हान्स पैसे काढू शकता.

उच्च शिक्षणासाठी (Education) संपूर्ण नोकरीच्या काळात जास्तीत जास्त १० वेळा. स्वतःच्या किंवा मुलांच्या उच्च शिक्षणाचा (Higher Education) खर्च भागवण्यासाठी तुम्ही हा अडव्हान्स घेऊ शकता.

लग्नाच्या खर्चासाठी (Marriage) संपूर्ण नोकरीच्या काळात जास्तीत जास्त ५ वेळा पीएफचे पैसे काढता येतील. स्वतःच्या, मुलांच्या किंवा कुटुंबातील पात्र सदस्यांच्या लग्नासाठी हा पैसा काढता येतो.

घर, प्लॉट किंवा होम लोनसाठी (Housing) वेगवेगळ्या कारणांसाठी मिळून जास्तीत जास्त ५ वेळा पैसे काढता येतात. नवीन फ्लॅट किंवा घर खरेदी करणे, प्लॉट घेणे, घराचे बांधकाम/दुरुस्ती (Renovation) करणे किंवा होम लोनची परतफेड करणे यासाठी अटी व शर्तींनुसार हा अडव्हान्स मिळतो.

विशेष किंवा आपत्कालीन परिस्थिती (Special Dynamic) एका आर्थिक वर्षात जास्तीत जास्त २ वेळा पीएफची रक्कम काढता येते.

ईपीएफओच्या (EPFO) नवीन नियमांनुसार, जर तुमच्या नोकरीला किंवा पीएफ मेंबरशिपला १२ महिने (१ वर्ष) पूर्ण झाले असतील, तर तुम्ही तुमच्या एकूण पीएफ शिल्लक रकमे पैकी (कर्मचाऱ्याचा हिस्सा + कंपनीचा हिस्सा आणि त्यावरील व्याज) ७५% पर्यंत रक्कम अडव्हान्स म्हणून काढू शकता.

EPFO
EPFO Update: PF खातेदारांनो, तुमच्या खात्यात व्याजाचे पैसे जमा झाले का? दोन मिनिटात करा चेक

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com