Firecracker Insurance : फक्त १० रुपयांत इन्शुरन्स! दिवाळीत फटाक्यांमुळे अपघात झाल्यास मिळणार आर्थिक मदत

Diwali Firecracker Insurance Benefits : दिवाळीतील फटाक्यांमुळे भाजल्यास किंवा अपघात झाल्यास आर्थिक मदत मिळू शकते का? 10 रुपयांपासून मिळणाऱ्या फटाका विम्याबद्दल जाणून घ्या.
Diwali Firecracker Insurance
Diwali Firecracker Insurance AI Image
Published On: 

दिवाळी म्हटलं की घरात रोषणाई, फटाक्यांची आतषबाजी आणि आनंदाचं वातावरण असतं. मात्र, या आनंदाच्या सणात एखादी छोटीशी चूक मोठ्या अपघाताला कारणीभूत ठरू शकते. फटाके फोडताना भाजणे, दिव्यामुळे आग लागणे किंवा इतर दुर्घटना घडण्याच्या घटना अनेकदा समोर येतात. अशा वेळी केवळ शारीरिक त्रासच नाही, तर उपचारांचा खर्चही कुटुंबासाठी चिंतेचा विषय ठरतो. अशा परिस्थितीत तुम्हाला फटाका विमा उपयोगी पडू शकतो.कसा मिळवायचा हा विमा ? जाणून घ्या सविस्तर माहिती.

काय आहे फटाका विमा?

फटाका विमा हा दिवाळीच्या काळात होणाऱ्या अपघातांसाठी तयार केलेला विमा आहे. विशेष म्हणजे हा विमा अगदी 10 रुपयांपासून उपलब्ध असल्याचा दावा काही कंपन्या करतात. मात्र, त्याची किंमत आणि संरक्षण पॉलिसीनुसार वेगवेगळे असू शकते. या विम्याचा कालावधी साधारण 10 ते 30 दिवसांपर्यंत असतो.

Diwali Firecracker Insurance
Breaking News : माजी खासदारावर गुन्हा दाखल, नाशिकमधील 'त्या' गाजलेल्या प्रकरणात कारवाई

अपघात झाल्यास किती पैसे मिळतात?

फटाके किंवा दिव्यांमुळे एखादी व्यक्ती भाजली किंवा जखमी झाली आणि तिला 24 तासांपेक्षा जास्त काळ रुग्णालयात दाखल करावे लागले, तर पॉलिसीच्या अटींनुसार उपचारांसाठी आर्थिक मदत मिळू शकते. काही योजनांमध्ये 10 हजार ते 25 हजार रुपयांपर्यंत वैद्यकीय संरक्षण दिले जाते.गंभीर अपघातात विमाधारकाचा मृत्यू झाल्यास किंवा हात, पाय अथवा डोळ्यांना कायमस्वरूपी गंभीर दुखापत झाल्यास ठरलेली रक्कम दिली जाऊ शकते. काही योजनांमध्ये कुटुंबातील इतर सदस्यांनाही संरक्षण मिळते.

Diwali Firecracker Insurance
Shocking : नवी मुंबई हादरली! रात्री दोन तरुणींवर गोळीबार; परिसरात खळबळ

घर आणि गाडीचे नुकसान झाल्यास ?

फटाका विमा घेतल्याने घर, फ्लॅट किंवा गाडीच्या नुकसानीची भरपाई मिळत नाही. अशा नुकसानीसाठी होम इन्शुरन्स किंवा मोटर इन्शुरन्सची गरज असते. घरातील फर्निचर, टीव्ही, फ्रिज यांसारख्या वस्तूंचे संरक्षण पॉलिसीत समाविष्ट आहे का, हे तपासणे महत्त्वाचे आहे.

Diwali Firecracker Insurance
Bank Holiday : धनत्रयोदशी बँक बंद राहणार की सुरु? जाणून घ्या RBI चे महत्त्वाचे अपडेट्स

विमा घेण्यापूर्वी या गोष्टी तपासा

PhonePe, CoverSure आणि Bajaj Finserv यांसारख्या प्लॅटफॉर्मवर अशा प्रकारच्या विमा योजना उपलब्ध असू शकतात. मात्र, विमा घेण्यापूर्वी त्याच्या अटी, कव्हरेज आणि कालावधी नीट समजून घ्या. तुमच्याकडे आधीच पुरेसा हेल्थ इन्शुरन्स आणि पर्सनल ॲक्सिडेंट विमा असेल, तर वेगळा फटाका विमा घेण्याची गरज कदाचित भासणार नाही. अपघातापासून बचावासाठी काळजी घेण्यासोबतच योग्य विमा संरक्षण असणेही महत्त्वाचे आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.