Dhirubhai Ambani Birth Anniversary: मसाल्याच्या व्यापारातून उभारलं रिलायन्सच साम्रज्य; धीरूभाईंनी मातीतूनही कमावला होता पैसा

Dhirubhai Ambani HBD: धीरूभाई अंबानी यांनी शून्यातून रिलायन्स कंपनीचं साम्रज्य उभारलं. ते कोणत्या व्यापारी कुटुंबातील नव्हते ना त्यांच्याकडे पुरेसा पैसा होता. त्यांनी जे काही साम्रज्य उभारलं ते त्यांच्या मेहनतीनं उभारले आहे. धीरुभाई यांच्याकडे व्यवसाय करण्याचं कौशल्य होतं.
Dhirubhai Ambani HBD
Dhirubhai Ambani HBD wire
Published On

Dhirubhai Ambani Birth Anniversary know Stories:

भारत आणि आशियातील सर्वात मोठा श्रीमंत कोण तर आपल्या डोक्यात आणि डोळ्यासमोर मुकेश अंबानी यांचं नाव येईल. मुकेश अंबानी यांची संपत्ती ८.८ लाख कोटी इतकी असल्याचं सांगितलं जातं. पण एक काळ असा होता, त्यांचे वडील धीरुभाई अंबानी यांना मात्र ३०० रुपयांच्या पगारावर नोकरी करावी लागत होती.(Latest News)

ते एका पेट्रोल पंपावर केवळ ३०० रुपयांच्या पगारासाठी काम करत. पण वेळ बदलंली आणि धीरूभाईंनी थेट देशातील सर्वात मौल्यवान कंपनी स्थापन केली. धीरुभाई यांच्या जीवनाचा प्रवास खूप जबरदस्त आणि रोमांचकारी आहे. कोणत्या गोष्टीपासून पैसा निर्माण करायचा आहे याची पारख धीरूभाईंकडे होती. धीरूभाईंनी मातीतूनही लाखो रुपये कमावल्याचं सांगितलं जातं .

हा किस्सा अनेकांना माहिती नसेल. आज त्यांचा जन्मदिवस आहे. धीरूभाई यांचा जन्म २८ डिसेंबर १९३३ रोजी झाला होता. त्यांच्या जन्मदिनी आपण त्यांच्या जीवनातील काही किस्से जाणून घेणार आहोत. धीरूभाई अंबानी यांनी शून्यातून रिलायन्स कंपनीचं साम्रज्य उभारलं. ते कोणत्या व्यापारी कुटुंबातील नव्हते ना त्यांच्याकडे पुरेसा पैसा होता. त्यांनी जे काही साम्रज्य उभारलं ते त्यांच्या मेहनतीनं उभारलं. आपल्या मेहनतीच्या जोरावर त्यांनी कोट्यवधींचा व्यवसाय उभा केला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

महिन्याकाठी मिळायचे ३०० रुपये

धीरूभाई यांनी सुरुवातीला एका पेट्रोल पंपावर नोकरी केली. त्यावेळी त्यांना महिन्याला ३०० रुपयांचा पगार मिळायचा. वर्ष १९४९ मध्ये दहावी उत्तीर्ण झाल्यावर धीरूभाई येमेनला राहत असलेला भाऊ रमणीकलाल यांच्याकडे गेले. तेथे त्यांनी एका पेट्रोल पंपावर नोकरी केली. पगार म्हणून त्यांना ३०० रुपये मिळायचे.

पण धीरूभाई अंबनी (Dhirubhai Ambani) हे खूप मेहनती होते. त्यांची मेहनत पेट्रोल पंप (petrol pump) मालकाला दिसून आली. पेट्रोल पंप मालकाने त्यांना मॅनेजर बनवले. परंतु धीरूभाईंना नोकरीत रस नव्हता. काही दिवसानंतर काही पैसे जमवून ते देशात परत आले. देशात आल्यानंतर त्यांनी मुंबई (mumbai) गाठली. आपल्या चुलत भावाच्या मदतीने त्यांनी मसाल्याचा व्यपार सुरू केला. सुरुवातीला ते पश्चिमी देशात अद्रक, हळद, आणि इतर मसाले विकत असतं.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

अनेक क्षेत्रांना भेटी दिल्यानंतर धीरूभाई अंबानींना समजले की, ते परदेशातील पॉलिस्टर आणि भारतीय मसाले विकण्याचा व्यवसाय करू शकतील. चुलत भावाची मदत घेत त्यांनी सुरुवातीला पश्चिमी देशांमध्ये अद्रक, हळद, आणि इतर मसाले पदार्थ विकले. हा व्यवसाय वाढवण्यासाठी त्यांनी ८ मे १९७३ रोजी रिलायन्स कॉमर्स कॉर्पोरेशन या नावाने आपली कंपनी सुरू केली. या कंपनीतून धीरूभाई भारतीय मसाले परदेशात विकत आणि परदेशातील पॉलिस्टर भारतात विकत.

माती विकून पैसे कमवले

धीरूभाई अंबानी यांच्याकडे असलेलं व्यावसायिक कौशल्य आणि समजूतदारपणाचा अंदाज तेव्हा लक्षात येतो जेव्हा त्यांनी माती विकून पैसा कमावला होता. अरबस्तानच्या एका शेखला त्याच्या बागेत गुलाब हवे होते. यासाठी त्यांनी विशेष मातीची गरज होती. या गोष्टीची माहिती धीरूभाई यांना मिळाली त्याने त्या शेखला भारतातून माती पाठवली. यातून त्यांनी मोठा पैसा कमावल्याचं सांगितलं जातं. मसाल्यांनंतर आता धीरूभाईंनी कापडाचा व्यवसाय सुरू केला. त्यांनी पॉलिस्टरची निर्यात सुरू केली. त्यांनी त्यांचा पहिला ब्रँड विमल लाँच केला.

Dhirubhai Ambani HBD
Reliance industries: मुकेश अंबानी यांच्या कंपनीची कमाल; 5 दिवसांत गुंतवणूकदारांनी कमावले ५०००० कोटी

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com