NIA कोर्टाने अल कायदाच्या २ सदस्यांना सुनावली कठोर शिक्षा; आखली होती भारतात जिहाद घडवण्याची योजना

NIA court : अल-कायदा इन इंडियन सब-कॉन्टिनेंट (AQIS) च्या संघटनेच्या दोन सदस्यांना राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष कोर्टाने ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. दोघांवर दहशतवाद आणि हिंसाचाराच्या माध्यमातून भारतविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे.
NIA court
NIA courtSaam Tv
Published On

NIA court sentences 2 members of Al Qaeda :

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या विशेष कोर्टाने आज दोन कट्टरपंथीय सदस्यांना ७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली. कोर्टाने या दोषींना दंडही ठोठावला आहे. हे दोघेही अल-कायदा इन इंडियन सब-कॉन्टिनेंट (AQIS) च्या संघटनेचे सदस्य आहेत. दोषींवर दहशतवाद आणि हिंसाचाराच्या माध्यमातून भारतविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देण्याची योजना आखल्याचा आरोप आहे. या सदस्यांना शिक्षा मिळाल्याने आणि त्यांच्याविरुद्धातील पुरावे सिद्ध झाल्याने दहशतवादाविरोधात लढणाऱ्या एनआयएला मोठं यश मिळाल्याचं म्हटलं जात आहे. (Latest News)

(NIA) एनआयएने जारी केलेल्या माहितीनुसार एनआयएच्या कोर्टाने (court) या प्रकरणी आसामचा अख्तर हुसैन लस्कर उर्फ ​​एमडी हुसैन आणि पश्चिम बंगालचा अब्दुल अलीम मंडल उर्फ ​​एमडी जुबा अशी शिक्षा सुनवण्यात आलेल्या व्यक्तींची नावे आहेत. या दोघांना अनुक्रमे ४१,००० आणि ५१,००० रुपयांचा दंड कोर्टाने ठोठावलाय.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑनलाइन हँडलर्संनी कट्टरपंथी बनवले

एनआयएच्या (NIA) तपासानुसार शिक्षा झालेल्या दोन्ही दोषींना कट्टरपंथीय बनवले गेलं होतं. या दोघांना AQIS च्या परदेशी-आधारित ऑनलाइन हँडलर्सने म्हणजेच अल-कायदा इन भारतीय उपखंडात भरती करण्यात आले होते. हे दोन्ही सदस्य AQIS च्या उपक्रमांना पुढे नेण्यात सक्रिय होते. AQIS द्वारे भरती झाल्यानंतर हे लोक विविध टेलिग्राम (Telegram) गटांमध्ये सामील झाले होते.

भारतात जिहादची योजना

हे दोन्ही दहशतवादी (Terrorist) आणि हिंसाचाराच्या माध्यमातून भारतविरोधी अजेंड्याला प्रोत्साहन देण्यासाठी AQIS च्या कटाचा एक भाग म्हणून खोरासानमध्ये प्रशिक्षण घेणार होते. त्यासाठी या दोघांनी अफगाणिस्तानच्या (Afghanistan) खोरासान प्रांतात जाण्याचा कट रचला होता. प्रशिक्षण घेतल्यानंतर या दोघे भारतातील एका विशिष्ट समुदायाच्या सदस्यांविरुद्ध जिहाद पुकारण्याची योजना आखली होती. हे दोघे इतर तरुणांना कट्टरपंथी बनवण्याच्या आणि त्यांना AQIS मध्ये भरती करत होते.

NIA court
Pakistan News: पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यावर 'साडेसाती'; तुरुंगाबाहेर पाय ठेवताच पोलिसांनी परत केली अटक

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com