Pakistan News: पाकिस्तानच्या माजी परराष्ट्र मंत्र्यावर 'साडेसाती'; तुरुंगाबाहेर पाय ठेवताच पोलिसांनी परत केली अटक

Shah Mahmood Qureshi: सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच शाह महमूद कुरेशी यांना जामीन मंजूर केलं होत.जामीन मंजूर होऊन तुरुंगातून बाहेर पडताना अटक करण्यात आली.
Shah Mahmood Qureshi
Shah Mahmood QureshiFacebook
Published On

Shah Mahmood Qureshi Arrested:

भारताच्या शेजारील देश पाकिस्तानातील राजकारणात होणारी घडामोड इतर देशाचं लक्ष वेधून घेत आहे. इमरान खान यांच्या पक्षातील आणि त्यांच्या सरकारमधील मंत्र्यांवर साडेसातीचा फेरा पडल्याचं दिसत आहे. इमरान खान यांच्या सरकारमध्ये परराष्ट्र मंत्री (Former Foreign Affairs Minister) असलेले शाह महमूद कुरेशी यांच्याबाबत घडलेल्या प्रकारावरुन त्याची प्रचिती येते.दरम्यान पाकिस्तानच्या मुख्य न्यायालयाने शुक्रवारी माजी पंतप्रधान इमरान खान आणि त्यांचे जवळचे सहकारी कुरेशी यांना सिफर प्रकरणात जामीन मंजूर केला होता. न्यायालयाने दोन्ही नेत्यांना प्रत्येकी १० लाख रुपये जामिनासाठी जमा करण्यास सांगितले होते. (Latest News)

पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफ (Pakistan Tehreek-e-Insaf) पक्षाचे उपाध्यक्ष शाह महमूद कुरेशी (Shah Mahmood Qureshi) यांना बुधवारी अदियाला तुरुंगाबाहेरून पुन्हा अटक करण्यात आलीय. सर्वोच्च न्यायालयाने गेल्या आठवड्यातच त्यांना सिफर प्रकरणात जामीन मंजूर करण्यात आला होता. जामीन (Bail) मंजूर झाल्यानंतर ते तुरुंगातून (Jail) बाहेर पडत होते, त्याचवेळी त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली. पोलिसांकडून करण्यात आलेली अटक चुकीची आणि बेकायदेशीर असल्याचं कुरेशी मोठं-मोठ्याने ओरडून माध्यमांना सांगत होते.

फुटेजमध्ये पोलिसांचा (police) गणवेश घातलेला एक अधिकारी त्यांना पोलिसांच्या वाहनातून बाहेर ढकलताना दिसत आहे. पाकिस्तान तेहरीक-ए-इन्साफने (Pakistan Tehreek-e-Insaf) एक्सवर यासर्व प्रकरणाचा व्हिडिओ पोस्ट केलाय. सिफर प्रकरणातून कुरेशी यांना जामीन मिळाला होता ते अदियाला तुरुंगाबाहेर (Adiala Jail) येते होते, त्यावेळी त्यांना तुरुंगाबाहेरच पुन्हा अटक करण्यात आली. रावळपिंडीचे ( Rawalpindi) उपायुक्त (Deputy Commissioner) हसन वकार चीमा यांनी मंगळवारी कुरेशीच्या १५ दिवसांच्या नजरकैदेसाठी दिलेला आदेश मागे घेतल्याचं पक्षाने आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय. वृत्तानुसार हे वृत्त प्रसारित करेपर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही विधान अधिकृतपणे केलेले नाही.

हे वृत्त प्रसारित होईपर्यंत पोलिसांनी या प्रकरणी कोणतेही वक्तव्य जारी केलेले नव्हतं. दरम्यान कुरेशी यांना पोलीस जबरदस्तीने तुरुंगात ढकलत होते. त्यावेळी कुरेशी माध्यम प्रतिनीधींना आपण निर्दोष असल्याचं जोर-जोरात ओरडून सांगत होते. कुरेशी यांना पोलीस धमकवत जबरदस्तीने तुरुंगात ढकलत होते. मला बेकायदेशीरपणे अटक केली जात आहे.पोलीस सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची खिल्ली उडवत आहेत.

Shah Mahmood Qureshi
Rajouri Attack: सैन्य दलांनी अधिक सतर्क राहावे आणि दहशतवादाबाबत शून्य सहिष्णुता बाळगावी: राजनाथ सिंह

क्रूरता आणि अन्याय शिगेला पोहोचलाय. ते मला पुन्हा खोट्या प्रकरणात अटक करत आहेत. मी देशाचे प्रतिनिधित्व करतो, मी निर्दोष आहे आणि मला कोणतेही कारण नसताना राजकीय सूडबुद्धीने लक्ष्य केले जात आहे, असं कुरेशी जोर जोरात बोलून सांगत होते.

Shah Mahmood Qureshi
Russia-Ukraine war: युक्रेनच्या ५० ठिकाणांवर रशियाकडून ड्रोन हल्ला; रेल्वे स्टेशनवर जोरदार गोळीबार,६ जणांचा मृत्यू

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com