December New Rule : 1 डिसेंबरपासून नियमात होणार मोठे बदल! तुमच्या खिशावर होणार थेट परिणाम

December 2026 Financial Changes: 1 डिसेंबरपासून खूप मोठे बदल होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागण्याची शक्यता आहे.
December 2026 Financial Changes
December 2026 Financial Changessaam tv
Published On: 

डिसेंबर महिना सुरू होण्याआधीच तुमच्या खिशाशी संबंधित काही महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या. कारण १ डिसेंबर २०२६ पासून क्रेडिट कार्ड, शेअर बाजारातली गुंतवणूक, आधार अपडेट आणि इतर आर्थिक नियमांमध्ये बदल होणार आहेत. तसेच पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्र जमा करण्याची अंतिम मुदत जवळ आली आहे, तर RBI बैठकीकडे कर्जदारांचं लक्ष लागलं आहे. हे सहा महत्त्वाचे अपडेट्स तुमच्या आर्थिक नियोजनावर परिणाम करू शकतात.

SBI Card वापरणाऱ्यांना जास्त शुल्क

SBI Card ने काही व्यवहारांवरच्या शुल्कात बदल केलाय. १ डिसेंबरपासून ३० हजार रुपयांपेक्षा जास्त रकमेच्या पात्र ट्रान्सपोर्टेशन व्यवहारांवर १ टक्के जास्तीचे शुल्क आकारलं जाईल. तसेच एका बिलिंग सायकरलमध्ये पात्र इंधन खर्च ५० हजार रुपयांपेक्षा जास्त असतील तर संपूर्ण इंधन खर्चावर १ टक्के शुल्क आणि टॅक्स द्यावा लागेल.

December 2026 Financial Changes
EPFO New Rules: निवृत्तीनंतरही PF मधून पैसे काढता येणार; टॅक्सही लागणार नाही

कमोडिटी ट्रेडिंगच्या मार्जिन नियमांत बदल

SEBI कडून १ डिसेंबरपासून कमोडिटी डेरिव्हेटिव्ह्जसाठी सुधारित मार्जिन नियम लागू होईल. कमी जोखीम असलेल्या कमोडिटीसाठी ६ टक्के, मध्यम जोखमीसाठी ८ टक्के आणि जास्त चढ-उतार असलेल्या कमोडिटीसाठी १० टक्के किमान मार्जिन ठेवावं लागेल. त्यामुळे ट्रेडर्सच्या व्यवहारांवर परिणाम होऊ शकतो.

December 2026 Financial Changes
Chanakya Niti: पगारापासून बँक बॅलन्सपर्यंत...; 'या' 5 गोष्टी मरेपर्यंत कोणाला सांगू नका

NRI आणि OCI गुंतवणूकदारांसाठी KYC सोपे

३ डिसेंबरपासून पात्र NRI, OCI आणि काही परदेशी गुंतवणूकदारांना SEBI- नोंदणीकृत संस्थांकडे दूरस्थ पद्धतीने KYC प्रोसेस पूर्ण करता येईल. त्यामुळे फक्त पडताळणीसाठी भारतात येण्याची गरज कमी होईल.

आधार ई-मेल अपडेट मोफत

UIDAI ने आधार मोबाइल अॅपच्या मदतीने ई-मेल पत्ता अपडेट करण्यासाठी आकारले जाणारे ७५ रुपयांचे शुल्क ३१ डिसेंबर २०२६ पर्यंत माफ केलं आहे. ही सवलत फक्त ई-मेल अपडेटसाठी असेल.

पेन्शनधारकांसाठी जीवन प्रमाणपत्राची शेवटची तारीख

केंद्र सरकारच्या पेन्शनधारकांनी ३० नोव्हेंबरपर्यंत वार्षिक जीवन प्रमाणपत्र जमा करणं गरजेचं आहे. प्रमाणपत्र वेळेत जमा केलं नाही तर पेन्शन मिळण्यात अडचण येऊ शकते. डिजिटल जीवन प्रमाणपत्रासह अधिकृत माध्यमांचा वापर करता येईल.

RBI च्या बैठकीत EMI बाबत महत्त्वाचा निर्णय

RBI च्या पतधोरण समितीची बैठक २ ते ४ डिसेंबरदरम्यान होईल. या बैठकीत रेपो दराबाबत निर्णय घेतला जाईल. रेपो दरात बदल झाल्यास गृहकर्ज, वाहनकर्ज आणि वैयक्तिक कर्जाच्या व्याजदरांवर तसेच EMI वर परिणाम होऊ शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.