DA Hike: दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! ऑक्टोबरचा पगार किती रुपयांनी वाढणार? जाणून घ्या

DA Arrears 2026: केंद्रीय कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता जुलै २०२६ पासून ३ टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे.
DA Arrears 2026
DA Arrears 2026 saam tv
Published On: 

केंद्रीय सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्याबद्दल (DA Hike) महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे. जुलै २०२६ पासून लागू होणाऱ्या महागाई भत्त्यामध्ये ३ टक्के वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जातेय. ही वाढ मंजूर झाल्यावर सध्या ६० टक्के असलेला महागाई भत्ता ६३ टक्क्यांवर पोहोचू शकतो. मात्र, याबद्दल केंद्र सरकारची अधिकृत घोषणा होणं अजून बाकी आहे.

दिवाळीआधी DA वाढीची घोषणा होणार?

यंदा ८ नोव्हेंबरला दिवाळी साजरी होणार आहे. त्यामुळे केंद्रीय कर्मचारी संघटनांकडून दिवाळीआधी महागाई भत्ता आणि महागाई सवलतीची (DR) थकबाकी जाहीर करण्याची मागणी केली जातेय. १४ ऑक्टोबर रोजी कॉन्फेडरेशन ऑफ सेंट्रल गव्हर्नमेंट एम्प्लॉईज अँड वर्कर्सने कॅबिनेट सचिवांना पत्र लिहून प्रलंबित DA/DR आणि दिवाळीचा बोनसच्या मागणीसाठी आंदोलनाचं आवाहन केलं होतं.

DA Arrears 2026
डिलिव्हरी बॉईज अन् कॅब चालकांसाठी महत्त्वाची बातमी! पेन्शनचा नवा मार्ग मोकळा, जाणून घ्या सविस्तर

दरम्यान, गैर - राजपत्रित कर्मचार्‍यांसाठी ३० दिवसांच्या सॅलरीइतका बोनस, ₹६,९०८ पर्यंत, तसेच ११.४ लाखांहून जास्त रेल्वे कर्मचाऱ्यांसाठी ७८ दिवसांचा उत्पादकता संलग्न बोनस (PLB), ₹१७,९५१ पर्यंत, जाहीर झाल्याचं वृत्त आहे. मात्र बोनस आणि DA वाढ या दोन वेगळ्या बाबी आहेत.

DA Arrears 2026
Gulgule Recipe : दसऱ्याला गोडाचा बेत ठरला नाही? लाल भोपळ्याचे गुलगुले एकदा नक्की करून पाहा

३ टक्के DA वाढल्यास पगार किती वाढेल?

महागाई भत्त्याची गणना मूळ सॅलरीवर केली जाते. DA ६० टक्क्यांवरून ६३ टक्के झाल्यावर संभाव्य वाढ पुढीलप्रमाणे असेल.

१८,००० बेसिक सॅलरी : दरमहा ₹५४०, वर्षाला ₹६,४८०

२५,५०० बेसिक सॅलरी: दरमहा ₹७६५, वर्षाला ₹९,१८०

३५,४०० बेसिक सॅलरी : दरमहा ₹१,०६२, वर्षाला ₹१२,७४४

४४,९०० बेसिक सॅलरी : दरमहा ₹१,३४७, वर्षाला ₹१६,१६४

५६,१०० बेसिक सॅलरी : दरमहा ₹१,६८३, वर्षाला ₹२०,१९६

हे कॅलक्युलेशन ३ टक्क्यांच्या वाढीवर आधारित आहे. प्रत्यक्ष पगारातला बदल लागू नियम आणि इतर सॅलरी घटकांनुसार वेगळा असू शकतो.

थकबाकी आणि आठव्या वेतन आयोगाचं काय होणार?

DA वाढ १ जुलै २०२६ पासून लागू झाल्यास, मंजुरीनंतर पात्र कर्मचाऱ्यांना मागील महिन्यांची थकबाकी मिळू शकते. उदाहरणार्थ १८,००० बेसिक सॅलरी असलेल्या कर्मचाऱ्याला जुलै ते सप्टेंबर या तीन महिन्यांची संभाव्य थकबाकी १,६२० होईल.

आठवा वेतन आयोग हा DA वाढीपासून वेगळा विषय आहे. उपलब्ध माहितीनुसार, आयोगाला अहवाल सादर करण्यासाठी १८ महिन्यांचा कालावधी देण्यात आला आहे. २१ ऑक्टोबरच्या केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत DA वाढीबाबत निर्णय होईल का, याकडे कर्मचाऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com