Sakshi Sunil Jadhav
लाल भोपळा स्वच्छ धुऊन त्याचा बारीक कीस तयार करा.
भोपळ्याच्या किसामध्ये किसलेला गूळ घालून व्यवस्थित एकत्र करा.
मिश्रणात ५० ग्रॅम गव्हाचे पीठ घालून चांगले मिक्स करा.
मिश्रणात १ चमचा तूप घालून एकजीव करा.
गरजेनुसार तेल आणि चवीसाठी जायफळ पावडर घाला.
कढईत तेल गरम करून मंद ते मध्यम आचेवर ठेवा.
मिश्रणाचे छोटे गोल गोळे करून तेलात सोनेरी होईपर्यंत तळा. कुरकुरीत लाल भोपळ्याचे गुलगुले तयार होतील.