CNG Price Hike: महागाईचा भडका! सीएनजीचे दर २.५० रुपयांनी वाढले; प्रति किलोसाठी किती रुपये मोजावे लागणार?

CNG Price Hike: आखाती देशांमधील युद्धाचा परिणाम भारतावर होत आहे. पेट्रोल डिझेलपाठोपाठ आता सीएनजीच्या दरातदेखील वाढ झाली आहे. सीएनजीचे दर वाढल्याने रिक्षाचालकांना चांगलाच फटका बसणार आहे.
CNG Price Hike
CNG Price HikeSaam Tv
Published On
Summary

सीएनजीच्या दरात वाढ

प्रति किलोमागे २.५० रुपयांची वाढ

कार अन् रिक्षाचालकांना फटका

जागतिक पातळीवर सुरु असलेल्या युद्धामुळे सर्व देशांवर परिणाम होत आहेत. एलपीजी आणि पेट्रोल डिझेलच्या किंमती वाढल्या आहेत. त्यानंतर आता सीएनजीच्या किंमतीतदेखील वाढ झाली आहे. कारमध्ये लागणाऱ्या सीएनजीच्या किंमतीत वाढ झाली आहे. टोरेंट गॅसने सीएनजीच्या किंमतीत वाढ केली आहे.

CNG Price Hike
LPG Gas Cylinder : आता रांगेत उभे राहायची गरज नाही ; घरबसल्या ५ मिनिटांत करा एलपीजी कनेक्शन बंद, पैसेही परत मिळतील

सीएनजीच्या दरात वाढ (CNG Price Hike in Maharashtra)

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, जयपुरमध्ये टोरेंस गॅसने सीएनजीच्या किंमती २.५० रुपये प्रति किलोग्राममागे वाढल्या आहेत. त्यामुळे आता सीएनजीच्या नवीन किंमती ९३.४१ रुपये झाल्या आहेत. हे नवीन दर ३ एप्रिल २०२६ पासून लागू आहेत. राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी टोरेंस गॅसच्या इंधनाचे पंप आहेत. या पंपावर किंमती वाढल्या आहेत.

पीटीआयच्या रिपोर्टनुसार, सीएनजीच्या वाढलेल्या किंमतीमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार आहे. सर्वात जास्त फटका तर ऑटोरिक्षा चालकांना बसणार आहे. सीएनजीच्या किंमतीदेखील वाढत असल्याने वाहनचाकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहे.

इतर राज्यांमध्ये सीएनजीच्या किंमती किती? (CNG Price In Maharashtra)

महाराष्ट्रात सीएनजीचे दर ९४.५ रुपये प्रति किलोग्राममागे आहेत. उत्तर प्रदेशमध्ये सीएनजीच्या किंमती ९३.५० रुपयांपासून ते ९६.२५ रुपयांपर्यंत आहेत. पंजाबमध्ये सीएनजी गॅसची किंमती ७१.७५ रुपयांपासून ते ९४.२५ रुपये झाले आहेत. तेलंगणामध्ये सीएनजीच्या किंमती ९९ रुपये आहेत.

CNG Price Hike
Petrol Diesel Price: पेट्रोल डिझेलच्या दरात बदल; वाचा मुंबई, पुणे ते नाशिक, नागपूरमधील भाव

सीएनजीच्या किंमती वाढल्याने चिंता निर्माण झाली आहे. रिक्षाचालकांना सीएनजीसाठी जास्तीचे पैसे मोजावे लागणार आहेत. त्यामुळेच त्यांचे बजेट कोलमडणार आहेत. यामुळे रिक्षाच्या भाड्यात वाढ करण्याची मागणी केली जात आहे.

CNG Price Hike
Petrol Diesel Price : डिझेल तब्बल २५ रुपयांनी महागले, पेट्रोलच्या दरातही मोठी वाढ, या कंपनीने अचानक वाढवल्या किंमती

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com