Uco Bank 820 Crore scam: CBIची मोठी कारवाई; महाराष्ट्र, राजस्थानमधील ६७ शहरांमध्ये छापे

CBI Raid on UCO Bank Revealed 820 Crore Scam: सार्वजनिक क्षेत्रातील UCO बँकेतील ८२० कोटी रुपयांच्या संशयित IMPS घोटाळ्याप्रकरणी CBI सीबीआयने मोठी कारवाई केली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने एकाच वेळी देशातील ६७ ठिकाणी छापे टाकलेत.
CBI Raid on UCO Bank and Revealed  Scam
CBI Raid on UCO Bank and Revealed ScamANI
Published On

UCO Bank 820 Crore Scam:

सार्वजनिक क्षेत्रातील युको बँकेतील घोटाळ्याच्या तपासासंदर्भात सीबीआयने मोठी कारवाई केली. छाप्यादरम्यान कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी राजस्थान पोलिसांचे १२० पोलीस कर्मचारी या कारवाईदरम्यान सीबीआयच्या पथकासोबत होते. यात सशस्त्र दलांचाही सहभाग होता. २१० जणांच्या ४० पथकांनी ही कारवाई केली. यामध्ये १३० सीबीआय अधिकारी, ८० खासगी साक्षीदार आणि विविध विभागातील लोकांचाही या कारवाईत समावेश होता.(Latest News)

UCO बँकेतील ८२०कोटी रुपयांच्या संशयास्पद IMPS व्यवहाराशी संबंधित तपास करताना सीबीआयने (CBI) महाराष्ट्र (Maharashtra) आणि राजस्थानमध्ये एकाच वेळी ६७ ठिकाणी छापे टाकलेत. IMPS ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची (Reserve Bank of India) त्वरित ऑनलाइन पेमेंट सुविधा आहे. UCO बँकेच्या वेगवेगळ्या खात्यांमधून सुमारे ८२० कोटी रुपयांचे संशयास्पद IMPS व्यवहार झालेत. या घडामोडीबाबत यूको बँकेने २१ नोव्हेंबर २०२३ रोजी सीबीआयकडे तक्रार केली होती.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

त्यानंतर सीबीआयने या प्रकरणाचा तपास सुरू केला असून आज छापेमारी केली. १० नोव्हेंबर २०२३ ते १३ नोव्हेंबर २०२३ दरम्यान युको बँकेच्या आयएमपीएसद्वारे झालेल्या व्यवहारात घोटाळा झाल्याचा संशय आहे. बँकेच्या तक्रारीनुसार ७ खासगी बँकांच्या १४,६०० खातेदारांनी युको बँकेच्या ४१,००० खातेदारांच्या खात्यात चुकीच्या पद्धतीने IMPSव्यवहार केले गेले.

ग्राहकांच्या खात्यातून एकही पैसा डेबिट झाला नाही, परंतु युको बँकेच्या ४१,००० खात्यांमध्ये एकूण ८२० कोटी रुपये जमा झाले. यापैकी बहुतेक खातेदारांनी वेगवेगळ्या बँकिंग चॅनेलद्वारे बँकेतून पैसे काढल्याने याचा फायदा झाला. यापूर्वी या प्रकरणाच्या तपासादरम्यान सीबीआयने डिसेंबर २०२३ मध्येही अनेक ठिकाणी छापे टाकले होते. त्यानंतर कोलकाता आणि मंगळुरूमध्ये खासगी बँकधारक आणि युको बँकेच्या अधिकाऱ्यांच्या १३ ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

यानंतर ६ मार्च २०२४ रोजी सीबीआयने राजस्थान आणि महाराष्ट्रातील जोधपूर, जयपूर, जालोर, नागपूर, बारमेर, फलोदी आणि पुणे येथे छापे टाकले. या छाप्यांमध्ये युको बँक आणि आयडीएफसी बँकेशी संबंधित १३० संशयास्पद कागदपत्रे आणि ४३ डिजिटल उपकरणे जप्त करण्यात आलीत. हे उपकरणे फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आली आहेत. त्यात ४० मोबाईल फोन, २ हार्ड डिस्क, इंटरनेट डोंगल यांचा समावेश आहे. सीबीआयने घटनास्थळी आणखी ३० संशयितांची चौकशी केली आहे.

CBI Raid on UCO Bank and Revealed  Scam
Fake Medicines: तुम्ही बनावट औषधे खाताय? फेक मेडिसिन गँगचा पर्दाफाश, कारखान्यावर छापा, कोट्यवधींची औषधे जप्त

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com