- अजय सोनवणे
रेणुका सूत गिरणीसाठी घेतलेल्या कर्ज प्रकरणी जिल्हा बँकेची फसवणूक प्रकरणात अंतरिम जामीन मिळावा यासाठी अद्ववय हिरे (Advay Hire) यांनी दाखल केलेला जामीन अर्ज आज (गुरुवार) मालेगाव न्यायालयाने (malegaon court) फेटाळला. यामुळे हिरेंचा कारागृहातील मुक्काम वाढला आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
रेणुका सुत गिरणी कर्ज आर्थिक फसवणूक प्रकरणी शिवसेना उपनेते अद्वय हिरे हे सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. त्यांनी जामिनावर साेडावे यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला हाेता. आज मालेगाव अपर सत्र न्यायालयात त्यांच्या जामीन अर्जावर निकाल हाेता.
त्यापूर्वी बुधवारी (ता. सहा मार्च) दिवसभर न्यायलयात दोन्ही बाजूंचा युक्तीवाद झाला. न्यायालयाने जामीन अर्जावरील निकाल राखून ठेवला होता. त्यांच्या जामिन अर्जावर निकाल हाेता. न्यायालयाने त्यांचा जमीन अर्ज फेटाळला आहे अशी माहिती नाशिक जिल्हा बॅंकेचे वकील वसीम शेख यांनी साम टीव्हीशी बाेलताना दिली. (Maharashtra News)
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.