PF Withdrawal Rules: नोकरी करताना संपूर्ण PF काढता येतो का? EPFO च्या नियमांमध्ये काय आहे, जाणून घ्या

EPFO Update: अनेक कर्मचाऱ्यांच्या मनात पीएफ संदर्भात अनेक प्रश्न असतात. त्यातला एक प्रश्न म्हणजे पीएफ संपूर्ण काढता येतो का, किंवा ईपीओचे नियम काय आहेत? तर याची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात.
PF Withdrawal Rules
PF Withdrawal RulesSAAM TV
Published On

सर्व कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. तुम्ही नोकरी करत असाल तर तुमच्या पगारातला काही भाग तुम्ही पीएफमध्ये जमा करता. तो पीएफ तुम्ही कधीही काढता येतो का, असा प्रश्न अनेकांच्या मनात असतो. त्यामध्ये (EPFO) इपीएफओच्या डिजिटल सेवा आणि नव्या अपडेट्समुळे पीएफ काढण्याच्या नियमांची उत्सुकता वाढलेली आहे. पण कर्मचारी भविष्य निधी (EPF) ही योजना प्रामुख्याने निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळावी यासाठी तयार करण्यात आली आहे. त्यामुळे नोकरी सुरू असताना संपूर्ण पीएफ रक्कम काढण्यास परवानगी नसते.

EPFOच्या नियमांनुसार, फक्त काही परिस्थितीमध्ये खातेदाराला १०० टक्के पीएफ रक्कम काढता येतो. कर्मचारी 58 वर्षांचा झाल्यानंतर रिटायरमेंटच्या वेळी लास्ट सेटलमेंटसाठी अर्ज करून खात्यातले सर्व पैसे काढू शकतो. तसेच नोकरी सोडल्यानंतर किंवा बेरोजगार झाल्यानंतरही पूर्ण पैसे काढण्याची सुविधा उपलब्ध आहे.

जर एखादी व्यक्ती एक महिना बेरोजगार असेल तर ती पीएफमध्ये जमा असलेल्या रक्कमेतले 75 टक्के पैसे काढू शकते. त्यानंतर दोन महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ बेरोजगार असेल तर 25 टक्के रक्कमही काढण्याची परवानगी मिळते.

PF Withdrawal Rules
Mumbai Monsoon Tourism: स्वित्झर्लंडलाही टक्कर देणारी मुंबईजवळची ही 4 ठिकाणं; पावसाळ्यात सौंदर्य होतं दुप्पट

बरेच कर्मचारी नोकरी बदलल्यानंतर जुना पीएफ काढून घेतात. पण ईपीएफओ याला सहमती देत नाही. नोकरी बदलल्यावर युनिव्हर्सल अकाउंट नंबर (UAN) च्या मदतीने पीएफ खातं नवीन कंपनीत ट्रान्सफर करणं जास्त फायदेशीर ठरेल. त्यामुळे खात्यातल्या रकमेवर व्याज मिळत राहतं आणि भविष्यासाठी काही पैसेही जमा होतात.

तसेच तुम्ही नोकरीवर असताना काही महत्त्वाच्या गरजांसाठी पीएफ काढू शकता. उच्च शिक्षण, विवाह,घर खरेदी, घर बांधकाम, गृहकर्जाची परतफेड तसेच गंभीर आजाराच्या उपचारांसाठी ईपीएफओकडून रक्कम काढण्याची परवानगी दिली जाते. पण याची मर्यादा वेगवेगळी असते.

PF Withdrawal Rules
Famous Writer Actor: कलाविश्वातून वाईट बातमी! ७३ व्या वर्षी ज्येष्ठ अभिनेत्याचा जगाला निरोप; सिनेसृष्टीवर शोककळा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com