Mumbai Monsoon Tourism: स्वित्झर्लंडलाही टक्कर देणारी मुंबईजवळची ही 4 ठिकाणं; पावसाळ्यात सौंदर्य होतं दुप्पट

Sakshi Sunil Jadhav

विकेंड प्लान

मुंबईपासून काही तासांच्या अंतरावर असलेली ही चार ठिकाणं निसर्गप्रेमींसाठी खास आकर्षण ठरत आहेत. तुम्ही सुद्धा या ठिकाणाला भेट देऊ शकता.

places near Mumbai | google

बेस्ट पिकनिक प्लान

मान्सून सुरू होताच मुंबईकरांची पावलं हिल स्टेशनकडे वळतात. शहराच्या गोंगाटापासून लांब जाऊन निसर्गाच्या सान्निध्यात वेळ घालवण्यासाठी हा चांगला ऋतू मानला जातो.

places near Mumbai

लोणावळ्याचे दृश्य

मुंबईपासून अंदाजे 90 किमी अंतरावर असलेलं लोणावळा पावसाळ्यात खूपच सुंदर दिसतं. तिथल्या हिरव्यागार दऱ्या आणि धबधबे पर्यटकांना आकर्षित करतात.

weekend getaway near Mumbai

भुशी धरण आणि टायगर पॉईंट

लोणावळ्यातल्या भुशी धरण, टायगर पॉईंट आणि राजमाची किल्ला पाहण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक भेट देतात. पावसाच्या सरींमध्ये या ठिकाणांचे सौंदर्य जास्त खुललेलं दिसतं.

monsoon road trips

खंडाळ्याचा निसर्ग

लोणावळ्याजवळ असलेला खंडाळा शांत आणि रम्य वातावरणासाठी प्रसिद्ध आहे. पावसाळ्यात तिथले घाटातले रस्ते धुक्याने झाकलेले दिसतात.

monsoon road trips

अमृतांजन पॉईंट

खंडाळ्यातल्या अमृतांजन पॉईंट आणि ड्यूक्स नोज या ठिकाणाहून सह्याद्री पर्वतरांगांचे अप्रतिम दृश्य पाहायला मिळेल.

Sahyadri mountain views

माथेरानची शांतता

माथेरान हे आशियातले वाहनमुक्त हिल स्टेशन आहे. त्यामुळे तिथल्या वातावरणात स्वच्छ, शांत आणि प्रदूषणमुक्त राहता येतं.

Sahyadri mountain views

इगतपुरीचा निसर्ग

नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी पावसाळ्यात हिरवाईने नटून जाते. धुक्याने वेढलेले डोंगर आणि कोसळणारे धबधबे मन मोहून टाकतात.

Sahyadri mountain views

NEXT: पावसाळ्यात घरात डासांचा हैदोस? महागडी औषधं नकोत, चहा पावडरचा करा 'असा' वापर

Tea Powder Hacks | google
येथे क्लिक करा