Fact Check : 5 रुपये नोटेच्या बदल्यात 51 लाख मिळणार? व्हायरल मेसेजमागचं सत्य काय?

viral message fact check : जुन्या ५ रुपयांच्या नोटेच्या बदल्यात ५१ लाख रुपये मिळणार असल्याचा दावा करणारा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. ३ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचे प्रकरणही समोर आले आहे.
viral message fact check
viral message fact checkSaam TV Marathi
Published On

old ₹5 note worth ₹51 lakh viral message fact check : 5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात 51 लाख रुपये मिळणार असल्याचा दावा करणारा व्हिडिओ व्हायरल होतोय. पण, खरंच या व्हिडिओतील दावा खरा आहे का? 5 रुपयांची जुनी नोट दिल्यानंतर पैसे मिळतात का? याची आम्ही पडताळणी केली...मग सत्य समोर आलं पाहुयात.

5 रुपयांची जुन्या नोट तुमच्याकडे असेल तर तुम्हाला 51 लाख रुपये मिळतील असा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय...इन्स्टावर व्हिडिओ आणि एक मेसेजही व्हायरल होतोय...त्यामुळे हा दावा केल्याने अनेकांना आश्चर्याचा धक्का बसलाय...खरंच जुनी 5 रुपयांची नोट दिल्यावर 51 लाख रुपये मिळतात का...? 5 रुपयांच्या नोटेला एवढं का महत्त्वं आलंय...? एवढे पैसे देण्यामागचं काय कारण आहे...? असे सवालही उपस्थित होतायत...त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात...

viral message fact check
राजकारणात मोठा भूकंप! भाजपने सोडली बंडखोर खासदारांची साथ; स्वबळावर निवडणुका लढण्याचा निर्णय

व्हायरल मेसेज - 5 रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात तब्बल 51 लाख रुपये मिळवून देऊ.

असा मेसेज येतो...त्यासोबत एक व्हॉट्सअप नंबरही दिला जातो...अनेकांनी आपल्याकडील 5 रुपयांच्या नोटाही पाठवल्याचं आढळून आलं. पण, खरंच या मेसेजमध्ये तथ्य आहे का...? एवढे पैसे देण्यामागचं काय कारण आहे हे आम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न केला...त्यावेळी आमच्या पडताळणीत धक्कादायक माहिती समोर आली...वरळीत अशा प्रकारे पैशांचं आमिष दाखवून एका व्यक्तीची 3 लाखाची फसवणूक केली...फसवणूक झालेल्या व्यक्तीनं इन्स्टाग्रामवरील रील पाहून आरोपींशी संपर्क साधला...त्यानंतर विविध बहाण्यानं QR कोडद्वारे संंबंधिताकडून पैसे उकळण्यात आले...त्यामुळे आमच्या आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात...

viral message fact check
Manoj Jarange : मनोज जरांगेंवर ₹१,००० कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप, ED कडे तक्रार दाखल

व्हायरल सत्य, साम इन्व्हिस्टिगेशन

5 रुपयांची नोट देऊन 51 लाख मिळत नाही

पैसे देण्याच्या आमिषाने फसवणुकीचा डाव

आरोपींनी QR कोडद्वारे आधी पैसे मागवले

पैसे देण्याच्या आमिषाने 3 लाख उकळले

कुणीही असे मागितल्यास देऊ नका

या प्रकरणी वरळी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...वरळी पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जातोय...

त्यामुळे आमच्या पडताळणीत 5 रुपये नोटेच्या बदल्यात 51 लाख मिळणार असल्याचा दावा असत्य ठरलाय...अशा आमिषांना बळी पडू नका...

साक्षी यादव साम टीव्ही मुंबई

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com