BSE Sensex Today : सेन्सेक्सचे विक्रमी उड्डाण; इतिहासात पहिल्यांदाच 70, 000 पार, निफ्टीही जोरदार

Share Market Today : या आठवड्याच्या पहिल्या दिवशीच बीएसई सेन्सेक्सने विक्रमी झेप घेत इतिहास रचला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ७०,००० अंकांची उच्चांकी पातळी गाठली.
BSE Sensex Today Update
BSE Sensex Today UpdateSAAM TV
Published On

BSE Sensex crosses 70000 lavel :

बीएसई सेन्सेक्सनं सोमवारी, ११ डिसेंबरला विक्रमी झेप घेतली. इतिहासात पहिल्यांदाच सेन्सेक्सने ७०,००० हून अधिक अंकांची पातळी गाठली. सेन्सेक्स सकाळी ६९,९२५. ६३ अंकांवर खुला झाला. त्यानंतर काही वेळातच ७०,०५७.८३ अंकांवर पोहोचला.

इंडसइंड बँक, एचसीएल टेक्नोलॉजीज आणि कोटक महिंद्रा बँकेच्या समभागांच्या मदतीनं सेन्सेक्सनं हा ऐतिहासिक टप्पा गाठला.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

शेअर बाजारात (Share Market) मागील आठवड्यापासूनच तेजी आहे. या आठवड्याच्या पहिल्या दिवशीही तेजी कायम दिसली. बाजाराचे दोन्ही निर्देशांक सकाळपासूनच विक्रमी पातळीवर होते.

आठवड्याच्या पहिल्या दिवशीच बीएसई सेन्सेक्सने विक्रमी झेप घेत इतिहास रचला. सेन्सेक्सने पहिल्यांदाच ७०,००० अंकांची उच्चांकी पातळी गाठली. निफ्टीच्या बाबतीतही हेच चित्र पाहायला मिळालं. निफ्टीही सुरुवातीच्या व्यवहारांच्या सत्रात नव्या विक्रमी स्तरावर पोहोचला.

सेन्सेक्सची ७०,००० पल्याड झेप

बीएसईचा सेन्सेक्सची (BSE Sensex) सुरुवात आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सकारात्मक झाली. व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स ८५.९३ अंक किंवा ०.१२ टक्के वाढून ६९,९११.५३ अंकावर खुला झाला. बाजारात काहीच मिनिटांत व्यवहार सुरू असताना सेन्सेक्सने ७०,००० अंकांचा टप्पा ओलांडला आणि आतापर्यंतची उच्चांकी गाठली. तत्पूर्वी, मागील आठवड्याच्या अखेरच्या दिवशी म्हणजेच शुक्रवारी सेन्सेक्सचा निर्देशांक ६९,८२५.६० अंकांवर बंद झाला होता. (Latest Marathi News)

BSE Sensex Today Update
Business Idea In Marathi : महिलांनो, ख्रिसमस आणि नवीन वर्षात सुरु करा हा व्यवसाय; फक्त ८००० रुपयांच्या गुंतवणुकीत कमवाल बक्कळ पैसा

निफ्टीचीही उच्चांकी

एकीकडे सेन्सेक्सनं ऐतिहासिक झेप घेतली असताना, निफ्टीही (NSE nifty) विक्रमवीर ठरत आहे. सोमवारी सकाळी व्यवहार सुरू होताच, निफ्टीनं १०.७० अंकांची उसळी घेतली आणि २०,९८०.१० अंकांच्या पातळीवर पोहोचला. सकाळी १० वाजेपर्यंत साधारण ४० अंकांच्या तेजीसह २१,०१९.८० अंकांच्या पातळीवर पोहोचला. निफ्टीची ही झेप आतापर्यंतची उच्चांकी पातळी ठरली आहे.

BSE Sensex Today Update
Narayana Murthy: 'मी स्वत: आठवड्याला ८५ ते ९० तास काम केलंय'; नारायण मूर्तींचं कामाच्या तासांवरील वक्तव्य पुन्हा चर्चेत

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com