वाढत्या महागाईला पाहाता हल्ली प्रत्येकाला अधिक पैसे मिळावे ही इच्छा असते. सध्याच्या युगात साइड इनकम असणे गरजेचे आहे. बऱ्याच वेळा बहुतेकांना नोकरी सोडून स्वत:चा व्यवसाय करण्याची इच्छा असते. परंतु, पुरेशा प्रमाणात भांडवल नसल्यामुळे व्यवसाय करता येत नाही.
जर तुम्हालाही व्यवसाय करायचा असेल तर आम्ही तुम्हाला असे काही व्यवसाय सांगणार आहोत ज्यामुळे तुम्हाला बक्कळ पैसा मिळू शकतो. सणासुदीच्या काळात या व्यवसायाला विशेष मागणी असते. ज्यामुळे तुम्हाला अधिक प्रमाणात पैसे मिळतील. तुम्ही ख्रिसमस किंवा नवीन वर्षात हा व्यवसाय सुरु करु शकता. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
हा व्यवसाय घरी बसून देखील तुम्ही सुरु करु शकता. गिफ्ट (Gift) बास्केट हा व्यवसाय सध्या ट्रेंडमध्ये आहे. जर तुम्हाला डेकोरेशनचे काम आवडत असेल तर तुम्ही यातून चांगले उत्पन्न मिळवू शकता. बाजारात (Market) गिफ्ट बास्केटची मागणी दिवसेंदिवस वाढताना दिसून येत आहे. हे गिफ्ट प्रामुख्याने वाढदिवस किंवा खास प्रसंगी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात विकत घेतले जाते.
गिफ्ट बास्केट व्यवसायात विविध प्रकारच्या भेटवस्तू देण्यासाठी टोपली बनवली जाते. ज्यामध्ये गिफ्ट चांगले पॅक करुन दिले जाते. ही टोपली तुम्ही घरी बनवू शकता. वेगवेगळ्या प्रकारे आणि वेगवेगळ्या किंमतीमध्ये (Price) ते विकता येऊ शकते. सध्या गिफ्ट पॅकिंगच्या क्षेत्रात मोठे बदल झालेले पाहायला मिळत आहे. गिफ्ट बास्केट व्यवसाय तुम्हाला कमी गुंतवणूक करावी लागेल. यासाठी तुम्हाला ५००० ते ८००० रुपयांपासून सुरुवात करु शकता.
1. मार्केटिंग कसे कराल?
या व्यवसायाची मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला गिफ्ट बॉक्सचा सॅमपल पीस बाजारात दाखवावा लागेल. तसेच तुम्ही ऑनलाइन वेबसाइटद्वारे देखील हा व्यवसाय करु शकता. पहिल्यांदा किमत कमी ठेवून बिझनेसमध्ये नाव कमावू शकता.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.